BerarTimes, Author at Berar Times

घरफोडी आणि चोरीच्या प्रयत्न प्रकरणी १० आरोपींना अटक
■ १५ लाख रुपये किंमतीच्या तीन चारचाकी गाड्या जप्त.

देवरी, दि. ०३:  आपल्या तत्परतेने घरफोडी (चोरी) करणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात देवरी पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणात एकूण १० आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेल्या १५ लाख रुपये किमतीच्या तीन चारचाकी गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे,  गेल्या २४ मे रोजी उषा नरेश शहारे (वय ४५, रा. वॉर्ड क्र. ०५, देवरी) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार ह्या दि २३च्या मध्यरात्री आपल्या कुटुंबासोबत झोपलेल्या असताना, अज्ञात आरोपींनी कंपाऊंडची भिंत ओलांडून त्यांच्या घरात प्रवेश केला आणि घर फोडण्याचा प्रयत्न केला. या तक्रारीच्या आधारे, देवरी पोलीसांनी भारतीय दंड संहिता, २०२३ च्या कलम ६२, ३३१(२) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सूचनेनुसार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (गोंदिया कॅम्प देवरी) अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी धाडी टाकून एकूण १० आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणात भारतीय दंड संहिता, २०२३ च्या कलम ३३१(४) आणि ६१ या कलमांचा समावेश करण्यात आला आहे.

अटक असलेल्या आरोपींमध्ये सौरभ हिरामण तलमले (वय २७ वर्षे, रा. पवनी, तहसील पवनी, जि. भंडारा), यादव रामचंद्र तलमले (वय २१ वर्षे, रा. पवनी, तहसील पवनी, जि. भंडारा),  नितीन शेखर वालदेकर (वय २१ वर्षे, रा. शनिवार वार्ड, पवनी, तहसील पवनी, जि. भंडारा), विलास प्रल्हाद रामटेके (वय ५२ वर्षे, रा. खरमटोला, तहसील कुरखेडा, जि. गडचिरोली), शुभम ज्ञानेश्वर तेलमासरे (वय २३ वर्षे, रा. मुरलीधर काशीराम बडगे, पाचपावली, बारसेनगर, नागपूर), महादेव डोंगर लाहार (रा. नागपूर), दिनदयाल अनयोनी बेंजामिन (वय ४० वर्षे, रा. सोनबानगर, बोपुताईनगर वॉर्ड, नागपूर), राधेश्याम उर्फ ​​राधे शिवदास खोब्रागडे (वय ३३ वर्षे, रहिवासी गंगाबाई घाट, सिद्धार्थ बौद्ध विहार जवळ, नागपूर),सौनव उर्फ ​​गुल्लू सुदेश मासूरकर (वय ३० वर्षे, रहिवासी पचापावली, बारसेनगर, नागपूर), अजय उर्फ ​​मामा राजेंद्र बागडे (वय ३५ वर्षे, रहिवासी बजरंगनगर, गल्ली क्र. १, भूखंड क्र. ५, मानेवाडा, नागपूर) यांचा समावेश आहे. यातील आरोपी क्र. १ ते ७ यांना ०१/०६/२०२६ रोजी, आरोपी क्र. ८ ला ०२/०६/२०२६ रोजी आणि आरोपी क्र. ९ व १० यांना ०३/०६/२०२६ रोजी अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपी कडून घटनेत समाविष्ट सुमारे १५ लाख किमतीच्या तीन चार चाकी वाहन जप्त केल्या आहेत. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ६ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यामध्ये देवरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद गेडाम, किरण मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप हातझाडे, रामराव कांदे, चंदन बाटवे, चालक पो.ना.पंकज पारधी, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र कुळमती, कमलकिशोर चौहान, घनश्याम मेंढे, विनोद बिसेन, गोपाल प्रसाद पांडे, पो. ह.राधेश्याम गाते, नरेंद्र फुलबांदे, रवी दहीपळे, पो.ना. संतोष सामरीत आणि पो. शि.संदीप तांदळे यांनी हे मोठे यश मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

या प्रकरणाचा पुढील तपास देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील स्वतः करत आहेत.

The post घरफोडी आणि चोरीच्या प्रयत्न प्रकरणी १० आरोपींना अटक appeared first on Berar Times.

निवृत्ती नव्हे, नव्या इनिंगची सुरुवात! डॉ. धुमनखेडे यांच्या प्रदीर्घ सेवेला मित्र परिवाराची मानाची सलामी
डॉ. दीपक धुमनखेडे यांचा मित्र परिवारातर्फे भावपूर्ण सेवानिवृत्ती सत्कार

देवरी,दि.०१: प्रदीर्घ, निष्कलंक आणि आदर्श सेवेच्या बळावर समाजातील प्रत्येक घटकाचा आदर मिळवणारे आदरणीय डॉ. दीपक धुमनखेडे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा आज सोमवारी (दि.०१) त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव करण्यासाठी आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. दीपक धुमनखेडे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य खात्यामध्ये ३५ वर्षे सेवा देत डॉ. धुमनखेडे हे काल ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा बराच सेवाकाल हा देवरी तालुक्यात गेला. याप्रसंगी बोलताना मित्र परिवारातील स्नेहींनी डॉ. धुमनखेडे यांच्या सेवेतील कटिबद्धता, त्यांचा मनमिळावू स्वभाव आणि संकटकाळात मित्रांना व समाजाला नेहमी मदत करण्याची त्यांची वृत्ती याबद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. “डॉ. धुमनखेडे हे शासकीय सेवेतून निवृत्त झाले असले, तरी सामाजिक कार्यातून ते कधीही निवृत्त होऊ शकत नाहीत; त्यांचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना यापुढेही कायम ऊर्जा देत राहील,” अशा भावना उपस्थित मित्रांनी व्यक्त केल्या.

सत्काराला उत्तर देताना डॉ. दीपक धुमनखेडे भावुक झाले होते. ते म्हणाले, “आजवरच्या सेवाकाळात कर्तव्य बजावताना मिळालेली आपुलकी आणि आज मित्र परिवाराने दिलेला हा सन्मान माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. या प्रेमाच्या बळावरच पुढील आयुष्यातील सामाजिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या मी आनंदाने पार पाडेन.”

या सोहळ्याला डॉ. धुमनखेडे सरांचे सर्व स्नेही, मित्र परिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन  रवी बंसोड यांनी केले. उपस्थितांचे आभार  मनोहर बडोले यांनी मानले. यावेळी मुख्य उपस्थितीमध्ये साप्ताहिक बेरारटाईम्सचे सहसंपादक सुरेश भदाडे, विजय टेंभूर्णीकर, देवराम शहारे, डॉ. बिसेन, जितेंद्र वासनिक आदी मान्यवरांचा समावेश होता.

The post निवृत्ती नव्हे, नव्या इनिंगची सुरुवात! डॉ. धुमनखेडे यांच्या प्रदीर्घ सेवेला मित्र परिवाराची मानाची सलामी appeared first on Berar Times.

मुल्ला येथील आस्था अग्रवाल तालुक्यातून प्रथम
देवरी,दि.०८- नागपूर माध्यमिक शालांत परीक्षेचा आज १०वी निकाल आला. यामध्ये देवरी तालुक्यातील मुल्ला या छोट्याशा गावातील आस्था मुकेश अग्रवाल या विद्यार्थिनीने ९६.८० टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला.

आज दहावी बोर्डाचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये मुल्ला येथील किराणा व्यापारी मुकेश छोटेलाल अग्रवाल यांची मुलगी आस्था हिने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आस्थाच्या या यशाने तिच्या कुटुंबीयासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या यशाने प्रभावीत होऊन अनेक विद्यार्थी तिच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जाण्याचे स्वप्न बाळगून असल्याचे दिसून आले.

संपूर्ण देवरी तालुक्यातून आस्थावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आपले आई-बाबा, शिक्षक आणि सर्व मार्गदर्शक यांना दिले आहे. तिच्या यशाचे कौतूक करीत मुल्लाचे सरपंच कल्पना बागडे यांचेसह ग्राम विकास अधिकारी शहारे, पोलिसपाटील ललिता भुते, कृषि अधिकारी श्री. सलामे, महावितरणचे गुलाब शहारे, सुनील शिवणकर, सुरेंद्र मेंढे, मुख्याध्यापिका गभणे, शिक्षिका शीतल उके, सुशिला भेलावे, बेरारटाईम्सचे सहसंपादक सुरेश भदाडे, एलआयसीच्या अनिता भदाडे, कुणाल गौपाले, योगेश हेमणे, दीपक राहुलकर, ग्राम पंचायत सदस्य मुकेश राऊत, जगतराम कुरसुंगे, राजकुमार कुथीर,योगेश फुंडे, वनिता लाडे, राजकुमार खोटेले, दिनेश शिवणकर, राजकुमार भेंडारकर, अॅड महेश पोगडे, राजेश पटले, वीरेंद्र पोगडे, विजय खोटेले आदी मान्यवरांनी अभिनंदन करीत गावाचे नाव उंचाविल्याबद्दल तिचा गौरव केला. तिने मिळविलेल्या यशाने गावातील इतर ही विद्यार्थी प्रेरणा घेतील, अशा आशा सरपंच बागडे यांनी व्यक्त केली.

The post मुल्ला येथील आस्था अग्रवाल तालुक्यातून प्रथम appeared first on Berar Times.

देवरीच येथील मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयाचे सुयश
कला शाखेतून क्रिश मधुलाल चौहान हा जिल्ह्यातून द्वितिय

देवरी,दि.०४- मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय, देवरी येथील इयत्ता १२वी च्या परीक्षेला सत्र २०२५-२६ ला विज्ञान शाखेत १५४,तर कला शाखेत १३४ विद्यार्थी बसले होते. या परीक्षेत महाविद्यालयाला सुयश प्राप्त झाले.

यापैकी विज्ञान शाखेचा ९८.७० टक्के तर कला शाखेचा८५.१७ टक्के निकाल लागला, कला शाखेतून क्रिश मधुलाल चौहान ९२.८३% गुण घेऊन गोंदिया जिल्ह्यात द्वितीय तर तालुक्यातुन प्रथम मान मिळवला, द्वितीय कावेरी प्यारेलाल वर्चो ८३.८३% व तृतीय महिमा कवलसिंग नेताम ८१% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले, तर विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक कु.महक नुरेश चंदनमलागर ४३४ गुण, गुंजन शंकर राऊत ४३४ गुण , द्वितीय क्रमांक कु. सुचाली रमेश बिंझलेकर ३९९ गुण, तृतीय क्रमांक कु.स्नेहल राजेश बिंझलेकर ३९८ गुण संपादन केले,

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मा.संस्थापक वासुदेवरावजी गजभिये साहेब, संस्था सचिव मा. रामकुमारजी गजभिये साहेब, प्राचार्य जी.एम.मेश्राम, मुख्याध्यापक व्ही.एस.गेडाम, उपमुख्याध्यापक एस.पी. देशमुख, पर्यवेक्षक डी.एच. ढवळे, शाळा उपप्रमुख आर.एन.कारेमोरे, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले .

The post देवरीच येथील मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयाचे सुयश appeared first on Berar Times.

आदिवासी विद्यार्थिनी अल्का मरसकोल्हेची ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
पालकमंत्री मा.ना.इंद्रनील नाईक यांच्या कडून शुभेच्छा संदेश…

देवरी,दि.३१- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा बीजेपार येथील विद्यार्थिनी अल्का रामदास मरसकोल्हे हिने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ८०० मीटर धावणे आणि ४×४०० मीटर रिले स्पर्धेसाठी तिची पहिल्या ट्रायबल ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेच्या पात्रता फेऱ्या पालघर व झारखंडमधील रांची येथे पार पडल्या. या दोन्ही फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अल्काने मुख्य स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. तिच्या या यशामुळे गोंदिया जिल्ह्याचा तसेच महाराष्ट्राचा मान उंचावला आहे.

अल्का हिच्या या यशाबद्दल महाराष्ट्राचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन तसेच मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी अभिनंदन केले आहे. त्यांनी शुभेच्छा संदेशात अलकाच्या चिकाटी, मेहनत आणि क्रीडाकौशल्याचे कौतुक करत हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण आदिवासी समाजासाठी व राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले आहे.

‘एक आश्रमशाळा एक खेळ’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली बिजेपार आश्रमशाळेत मिळालेले विशेष प्रशिक्षण, संतुलित आहार व पुरेसे क्रीडा साहित्य यामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगितले जात आहे. या यशामागे प्रकल्प अधिकारी श्री. उमेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा समन्वयक श्री. तुलसीदास बघाडे व मुख्याध्यापक श्री. अशोक इस्कापे यांचे नियोजन व समर्पण महत्त्वाचे ठरले. अल्काने आपल्या या उल्लेखनीय यशाचे श्रेय आई-वडील तसेच क्रीडा प्रशिक्षक श्री. महेंद्र कचलाम यांना दिले आहे.

अल्का मरसकोल्हे हिच्या या यशामुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात, आदिवासी समाजात तसेच आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

The post आदिवासी विद्यार्थिनी अल्का मरसकोल्हेची ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड appeared first on Berar Times.

देवरी येथे उबाठा गटाच्या वतीने शिवाजी महाराजांची जयंती साजरी
■ महाप्रसादाचे वितरण

देवरी,दि.०७: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी (ता.६ मार्च) देवरी येथे विरांगणा राणी दुर्गावती चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी (उबाठा)शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शैलेश जायस्वाल हे होते. याप्रसंगी देवरी तालुका प्रमुख सुनील मिश्रा,देवरी शहर प्रमुख राजा भाटिया, उप तालुका प्रमुख- राजू पटले, सुहाग गिरी, गोंविद बंसोड, धर्मेन्द्र जगनिक, डालचंद मडावी, डॉ.भुमेश पटले, विभाग प्रमुख-लोकनाथ लांजेवार, प्रशांत यादव, शाखा प्रमुख- हेमराज बावनकुडे, मनोहर मेश्राम, रमेश आचले, लल्लुप्रसाद उपाध्याय, राजु क्षिरसागर, मुलचंद मोहबे, यश गिरी, अजय गिरी, दिनेश डुंभरे, बादल टेंभुनीया, घनश्याम बावने यांच्यासह देवरी तालुक्यातील शिवसैनिक युवासैनिक, महिला संघटना, किसान सैनिक व तसेच समस्त संघटनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

या जयंती सोहळ्याचे संचालन व प्रास्ताविकातून तालुकाप्रमुख सुनील मिश्रा यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा केला जातो, असे म्हटले. तर उपस्थितांचे आभार शहरप्रमुख राजा भाटिया यांनी मानले.

या जयंती कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवरायांची मूर्तीपुजन आणि गोंड महाराणी दुर्गावती यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून जय घोषाने करण्यात आली. दरम्यान, एक हजारावर उपस्थित शिवसैनिक व नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

The post देवरी येथे उबाठा गटाच्या वतीने शिवाजी महाराजांची जयंती साजरी appeared first on Berar Times.

चिचेवाडाच्या हेमकृष्णने रोवला युपीएससी परीक्षेत झेंडा
चारवेळा केली एमपीएसी क्रॅक

धामनगाव येथे नायब तहसीलदार पदी कार्यरत

युपीएससी मध्ये मिळवली ८३९ रॅंक

देवरी, दि.०७-काल घोषित झालेल्या २०२५ बॅचच्या संघ लोक सेवा आयोगाच्या परिक्षेच्या निकालामध्ये देवरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील चिचेवाडा गावातील हेमकृष्ण प्रेमलाल पिसदे या आदिवासी युवकाने मानाचा झेंडा रोवला. परिणामी, हेमकृष्ण यांचे देवरी तालुक्यासह राज्यातूनही कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हेमकृष्ण याचा जन्म देवरी तालुक्यातील चिचेवाडा या अतिदुर्गम आदिवासी गावात झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण हे देवरी येथील मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयातून झाले. त्याने बीएची पदवी पुण्याच्या फर्ग्यूसन कॉलेज मधून संपादन केली तर एमएची पदवी सावित्रीबाई फुले महाविद्यालातून पूर्ण केली.

हेमकृष्ण याने चारवेळा महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केल्या असल्यातरी त्याचा डोळा युपीएसी परीक्षेवर होता. यामुळे चार वेळा एमपीएसीची परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी त्याला यामध्ये रस नव्हता. मुलगा एक ही नोकरी पत्करीत नसल्याचे पाहून वडील प्रेमलाल पिसदे यांनी त्याला नोकरी पत्करण्याची सल्ला दिला. म्हणून त्यानी मुंबई येथे पहिल्यांदा कामगार अधिकारी म्हणून नोकरीला सुरवात केली. पण त्यावर संतुष्ट न होता तो स्पर्धा परीक्षा देत राहिला. २०२५ मध्ये त्याची तहसीलदार पदी निवड झाल्याने अमरावती जिल्हातील धामनगाव येथे नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. सध्या हेमकृष्ण हा तेथे कार्यरत असताना काल युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये हेमकृष्ण याने संपूर्ण देशातून ८३९ रॅंक मिळवून यश संपादन केले आहे.

चिचेवाडा या त्याच्या जन्मगावात हेमकृष्णने मिळविलेल्या यशामुळे आनंदाचे वातावरण आहे. त्याचेवर संपूर्ण तालुक्यातील अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

The post चिचेवाडाच्या हेमकृष्णने रोवला युपीएससी परीक्षेत झेंडा appeared first on Berar Times.

मोरगाव अर्जूनी नजीक अपघात- एक ठार,दोन जखमी
गोंदिया,दि.२५- अर्जूनी मोरगाव तालुक्यातील देऊळगाव बोदरा जंगल परिसरात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन इसम गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली.

मृताचे नाव मंगेश शिवणकर (वय ४०) राहणार ढिवरखेडा (पालांदूर) असे आहे. जखमींमध्ये दिगंबर जयदेव मडावी (वय ३०) राहणा माहुरकुडा आणि गजेंग्र मारोती मेश्राम (वय२७) यांचा समावेश आहे.

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले असून पुढील चौकशी सुरू आहे.

The post मोरगाव अर्जूनी नजीक अपघात- एक ठार,दोन जखमी appeared first on Berar Times.

देवरी नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड
■ रितेश अग्रवाल, नुतन सयाम, पिंकी कटकवार यांची वर्णी

देवरी,दि.२५ : देवरी नगरपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या विषय समिती सभापती पदांसाठी मंगळवार (दि.२४) रोजी घेण्यात आलेल्या निवडणूक ही अविरोध पार पडल्याने सर्व सभापती बिनविरोध निवडून आले.

नवनिर्वाचित सभापतीमध्ये बांधकाम व पाणीपुरवठा सभापतीपदी रितेश सुरेश अग्रवाल, अर्थ नियोजन व क्रीडा सभापतीपदी नूतन अमरलाल सयाम आणि महिला व बालकल्याण सभापतीपदी पिंकी पारस कटकवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ही निवडणूक सभा उपजिल्हाधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पीठासीन अधिकाऱ्यांनी अर्जाची छाननी केल्यानंतर, प्रत्येक पदासाठी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा केली.

यावेळी नवनियुक्त सभापतींनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या प्रलंबित विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. प्रामुख्याने बांधकाम आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावणे, क्रीडा क्षेत्रासाठी सोयीसुविधा उपलब्ध करणे आणि महिला-बालकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्याचा मानस व्यक्त केला.

या सभेत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संजू उईके, उपाध्यक्ष प्रज्ञा संगीडवार, गटनेते शेंकी भाटिया, आफताब शेख, संजय दरवडे, तनुजा भेलावे, प्रभू डोंगरे, कौसल्या कुंभरे, कमल मेश्राम, पंकज शहारे, मोहन डोंगरे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी करिष्मा वैद्य प्रामुख्याने उपस्थित होत्या.

The post देवरी नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड appeared first on Berar Times.

उभ्या टँकरला धडक ; दुचाकीस्वार गंभीर जखमी
■ देवरी येथील एमआयडीसी परिसरातील सुफलाम कंपनी नजीकची घटना

देवरी, दि.१५ः उभ्या टैंकरला मागून धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर झाल्याची घटना आज रविवार(दि. १५ फेब्रुवारी) रोजी सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान देवरी येथील एमआयडीसी परिसरातील सुफलाम कंपनी नजीकच्या परसटोला रस्त्यावर घडली.

यातील गंभीर जखमीचे नाव अनुज कैलास मेश्राम (वय १५) रा. वार्ड क्र. १३ संजयनगर, देवरी असे आहे.  जखमीला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर  गोंदिया येथे हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, दुचाकी चालक अनुज आपल्या दुचाकी क्र. एम. एच. ३६ आर ६५२२ वर स्वार होऊन एमआयडीसी अंतर्गत असलेल्या परसटोला रस्त्यावरून जात होता. याच मार्गावर सुफलाम कंपनी असून परसटोला मार्गावर ट्रकांच्या खूप मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या असतात. अशातच कंपनीमध्ये आलेला टँकर क्रमांक के. ए. ०१ ए. पी. १३०० रस्त्याच्या बाजूला उभा होता. दुचाकी चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या टँकरला मागून जोरदार धडक दिली.

देवरी पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे.

अल्पवयीन दुचाकी चालकांचे शहरात प्रमाण वाढले; वाहतूक पोलिस गांभीर्य शून्य

चालक परवाना नसतांनाही युवक सर्रास दुचाकी चालवत आहेत. त्यांना हटकण्यापलीकडे पोलिस काहीही करत नाहीत. अद्याप या धूम स्टाईल तरुणावर कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. केवळ नाममात्र दंड करण्यापलीकडे कारवाई होत नसल्याने युवकांची हिंमत वाढत चालली आहे. परिणामी, ठिकठिकाणी छोट्या मोठ्या अपघाताची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता खरी गरज आहे ती यांच्यावर कारवाईचा करण्याची.

परसटोला मार्गावर वाहनांचा रांगाच रांगा; कारवाईची गरज.

देवरी शहरातील एमआयडीसी अंतर्गत जाणाऱ्या परसटोला मार्गावर सुफलाम कंपनी स्थापन झाल्याने, कच्चामाल पुरविणाऱ्या कंपनीला परसटोला मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असतात. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.

The post उभ्या टँकरला धडक ; दुचाकीस्वार गंभीर जखमी appeared first on Berar Times.