शैक्षणिक Archives - Berar Times

झेडपी शाळेत प्रवेशासाठी ‘वासुदेवाची’ साद! लाखनवाड्यातून पटसंख्या वाढीच्या मोहिमेचा शुभारंभ
खामगाव :जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या आणि गुणवत्ता वाढीसाठी बुलढाणा जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे एका अनोख्या प्रवेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपक्रमशील शिक्षक राजेश कोगदे यांनी चक्क ‘वासुदेव’चे रूप धारण करून घरोघरी जात, पालकांना आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्याचे भावनिक आणि प्रभावी आवाहन गायनाच्या माध्यमातून केले.

राज्याचे शिक्षण मंत्री ना. भुसे साहेब यांनी २ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत झेडपी शाळांच्या गुणवत्ता व पटसंख्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी बुलढाणा जिल्ह्यात सुरू झाली असून, लाखनवाडा गावातील हा उपक्रम या मोहिमेचा पहिला टप्पा ठरला आहे.

**विद्यार्थ्यांच्या १०० टक्के प्रगतीची हमी**

या अनोख्या मोहिमेदरम्यान शिक्षण विभागाच्या वतीने  सर्व पालक, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींना जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर १०० टक्के विश्वास ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीची शाश्वती विभागाकडून गटशिक्षणाधिकारी गायकवाड साहेब यांनी दिली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहेब,लाखनवाड्यातील जि.प.मराठी, उर्दू व जि.प.हायस्कुल शाळेच्या मुख्याध्यापक,शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती यांनी परिश्रम घेतले.

*झेडपी शाळांच्या यशाची उत्तुंग भरारी*

बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच एन.एम.एम.एस. (NMMS) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच, नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या ८० पैकी तब्बल ३८ विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळांमधील आहेत, ही जिल्ह्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत अभिमानाची बाब असून शिक्षक घरोघरी येऊन प्रवेशासाठी जे अथक प्रयत्न करत आहेत, त्यांच्या या प्रयत्नांना दाद देत पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेतच निश्चित करावा.

*विकास पाटील*  *शिक्षणाधिकारी प्राथमिक*  *जिल्हा परिषद बुलढाणा*

The post झेडपी शाळेत प्रवेशासाठी ‘वासुदेवाची’ साद! लाखनवाड्यातून पटसंख्या वाढीच्या मोहिमेचा शुभारंभ appeared first on Berar Times.

दरवर्षी प्रमाणे २६जून पासूनच शाळा सुरु करण्याची भाकपची मागणी
गोंदिया-दरवर्षीच्या शिक्षणाच्या कॅलेंडर प्रमाणे २६ जून पासूनच शाळा सुरु करण्यात यावी व १५ जून पासून शाळा सुरु करण्याचे आदेश शिक्षण विभागाने रद्द करावे व पुर्ववत २६ जून पासूनच शाळा सुरु करण्याची मागणी भारतीय कम्युनीस्ट पक्षाने केली आहे. याबाबद पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.मिलींद गणविर यांनी शालेय शिक्षणमंत्री व संबंधीत विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना  पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी विदर्भ विभागात २६ जून पासूनच शाळा सुरु करण्यात येत होत्या, याचे कारण की विदर्भात तापमानाची परिस्थीती पाहता २६ जून  ही तारीख निश्चीत करण्यात येत होती व राज्याच्या  उर्वरीत विभागात १५ जून पासून शाळा सुरु करण्यात येत होत्या. परंतु विदर्भाच्या ४० डीग्री सेल्सीयसच्या वर असलेल्या तापमानाच्या परिस्थीतीचा व याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा दुषपरिणाम न पाहता शिक्षण विभागाने सरसकट महाराष्ट्रात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचे आदेशीत केले आहे, हे तुघलकी आदेश शासनाने त्वरीत रद्द करुन पूर्ववत २६ जून पासूनच शाळा सुरु करण्याबद्दलची मागणी या विदर्भ विभागातील भारतीय कम्युनीस्ट पक्षासह पालक वर्ग करीत आहेत.

The post दरवर्षी प्रमाणे २६जून पासूनच शाळा सुरु करण्याची भाकपची मागणी appeared first on Berar Times.

बी.ए. अर्थशास्त्र : Data Science, AI आणि रोजगाराच्या नव्या संधींकडे नेणारा भविष्याभिमुख अभ्यासक्रम
नागपूर :रोजगाराच्या नव्या संधींकडे नेणारा भविष्याभिमुख बी.ए. अर्थशास्त्र अभ्यासक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू करण्यात आला आहे. या नवीन अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया आरंभ झाली आहे.

अर्थशास्त्राचा अभ्यास का करावा?

आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आणि जागतिकीकरणाच्या युगात विचारपूर्वक करिअर निवडणे फार आवश्यक आहे. १२ वी नंतर कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत जाणून घेणे फार आवश्यक आहे. विद्यार्थ्याने आपल्या आवडीनुसार करिअर निवडले तर तो आपल्या इच्छेनुसार कार्यक्षेत्र निवडू शकतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागामध्ये सत्र २०२६-२७ पासून अर्थशास्त्रात रोजगाराभिमुख पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. अर्थशास्त्र हा केवळ एक शैक्षणिक विषय नसून समाज, शासन, उद्योग, वित्तीय व्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्था समजून घेण्याचा प्रभावी आणि महत्वपूर्ण दृष्टिकोन आहे. महागाई, बेरोजगारी, गरिबी, असमानता यासारख्या समस्यांबरोबरच आर्थिक विकास, जागतिक व्यापार, करप्रणाली, सार्वजनिक धोरणे, वित्तीय बाजारपेठा, डिजिटल अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), हवामान बदल आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांच्या केंद्रस्थानी अर्थशास्त्र आहे.

अर्थशास्त्राचा अभ्यास विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळवून देत नाही, तर जगाकडे वैज्ञानिक, तर्कशुद्ध आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता विकसित करण्यास प्रवृत्त करतो. समाजातील आर्थिक समस्या समजून घेणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि योग्य उपाय सुचविणे यासाठी अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आज समाजामध्ये अभ्यासपूर्ण विषय मांडण्याची आणि योग्य दिशा देणाऱ्या विश्लेषकांची कमतरता आहे.

*अर्थशास्त्र विद्यार्थ्यांना काय शिकवते?*

अर्थशास्त्र केवळ पैशांचा किंवा बाजारपेठेचा अभ्यास नसून व्यक्ती, उद्योग, शासन आणि समाज यांच्या मदतीने उपलब्ध संसाधनांचा वापर करून आपल्या गरजा कशा पूर्ण करतात याचा शास्त्रीय अभ्यास आहे. अर्थशास्त्र विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक घडामोडींचे विश्लेषण करण्याची, त्यामागील कारणे समजून घेण्याची आणि समस्यांवर परिणामकारक उपाय शोधण्याची क्षमता विकसित करते. या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थी स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील आर्थिक बदल समजून घेण्यास सक्षम होतात.

अर्थशास्त्राच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात जसे –

*डेटा सायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात अर्थशास्त्राचे वाढते महत्त्व*

आजच्या डिजिटल युगात समंक शास्त्र (Data Science), Artificial Intelligence (AI), Machine Learning आणि Big Data यांचा वापर सर्वच क्षेत्रांमध्ये झपाट्याने वाढत आहे. उद्योग, वित्तीय संस्था, शासन, आरोग्य, शिक्षण आणि ई-कॉमर्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये दररोज प्रचंड प्रमाणात समंक निर्माण होत आहे. मात्र, केवळ समंक उपलब्ध असणे पुरेसे नाही; त्या समंकामागील आर्थिक, सामाजिक आणि मानवी वर्तनाशी संबंधित कारणे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. याच ठिकाणी अर्थशास्त्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.

समंक आपल्याला “काय घडत आहे?” हे सांगतो, तर अर्थशास्त्र “ते का घडत आहे?” आणि “त्याचे परिणाम काय असतील?” याचे स्पष्टीकरण देतो. त्यामुळे आर्थिक निर्णय, बाजारपेठेतील बदल, ग्राहकांचे वर्तन, गुंतवणूक, रोजगार, महागाई आणि विकास यांचे सखोल विश्लेषण करण्यासाठी अर्थशास्त्राची आवश्यकता अधिक वाढली आहे.

आज अनेक अग्रगण्य कंपन्या, बँका, संशोधन संस्था आणि शासन यंत्रणा अशा व्यक्तींचा शोध घेत आहेत ज्यांच्याकडे अर्थशास्त्राचे ज्ञान आणि समंक विश्लेषणाची कौशल्ये या दोन्हींचा संयोग आहे. त्यामुळे अर्थशास्त्र आणि समंक विश्लेषक यांचे संयोजन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आकर्षक आणि भविष्याभिमुख करिअर संधी निर्माण करीत आहे. या दोन्ही क्षेत्रांच्या समन्वयामुळे आर्थिक प्रवाहांचा अंदाज बांधणे, बाजारपेठेतील बदल आणि ग्राहकांच्या पसंतीचे विश्लेषण करणे, वित्तीय जोखमींचे मूल्यांकन करणे आणि सार्वजनिक धोरणांच्या परिणामकारकतेचा अभ्यास करणे शक्य होते. तसेच उद्योग, व्यापार, गुंतवणूक आणि व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात समंक-आधारित निर्णय प्रक्रियेला चालना मिळते. शाश्वत विकास, नैसर्गिक संसाधनांचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि भविष्यातील आर्थिक नियोजनासाठीही अर्थशास्त्र व समंक शास्त्राचे एकत्रित ज्ञान अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांचा संयोग विद्यार्थ्यांना आधुनिक रोजगार बाजारपेठेत अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनवतो.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचा बी.ए. अर्थशास्त्र (AEDP / ऑनर्स / संशोधन) अभ्यासक्रम वैशिष्ट्यपूर्ण का आहे?.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा अर्थशास्त्र विभाग शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून सुरू करीत असलेला बी.ए. अर्थशास्त्र (AEDP / ऑनर्स / संशोधन) हा अभ्यासक्रम विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी एक अद्वितीय आणि भविष्याभिमुख शिक्षणासह योजगाराची संधी आहे. हा केवळ पारंपरिक पदवी अभ्यासक्रम नसून, शिक्षण, कौशल्य विकास, उद्योग-अनुभव, संशोधन आणि रोजगारक्षमतेचा समन्वय साधणारा अभ्यासक्रम आहे.

विदर्भातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पुणे, मुंबई, दिल्ली किंवा इतर महानगरांमध्ये जावे लागते. परंतु आता नागपूरमध्येच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अनुषंगाने आधुनिक, संशोधनाभिमुख आणि उद्योग-संलग्न अर्थशास्त्र शिक्षण उपलब्ध होणार आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी स्थानिक स्तरावर उपलब्ध होईल.

या अभ्यासक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या उद्दिष्टांनुसार तीन पर्याय उपलब्ध असतील—AEDP (Apprenticeship Embedded Degree Programme), Honours आणि Honours with Research. त्यामुळे या अभ्यासक्रमातून विद्यार्थी रोजगार, उच्च शिक्षण किंवा संशोधन यापैकी एकाची निवड करून प्रगती करू शकतील. हेच या अभ्यासक्रमाला इतर पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांपेक्षा वेगळे बनवते.

*१. बी.ए. अर्थशास्त्र (AEDP)*

अभ्यासक्रमाच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांना सहा महिन्यांची अप्रेंटिसशिप म्हणजेच शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. या कालावधीत विद्यार्थ्यांना उद्योगातील कार्यपद्धती, व्यावसायिक वातावरण आणि प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळते. अनेक संस्थांकडून विद्यार्थ्यांना १२३०० पर्यंत विद्यावेतन (स्टायपेंड) देखील दिले जाईल. AEDP (Apprenticeship Embedded Degree Programme) हा आधुनिक शिक्षण आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दुवा निर्माण करणारा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष उद्योग, वित्तीय संस्था, संशोधन संस्था, बँका, लॉजिस्टिक्स क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि विविध शासकीय विभागांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योगाला आवश्यक असलेली कौशल्ये विकसित होतात आणि त्यांना वास्तविक कामकाजाची ओळख पदवी पूर्ण होण्यापूर्वीच प्राप्त होते. शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणाच्या (अप्रेंटिसशिप) माध्यमातून विद्यार्थ्यांचा उद्योग व संस्थांशी संपर्क वाढतो, व्यावसायिक नेटवर्क तयार होते आणि रोजगाराच्या संधी अधिक सुलभ होतात. शासनाच्या मदतीने या उद्योग संस्थांकडून अप्रेंटिसशिप कालावधीत १२३०० पर्यंत विद्यावेतन (स्टायपेंड) दिले जात असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक लाभही मिळू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पदवी पूर्ण होताच विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक पात्रतेबरोबरच उद्योगातील प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे त्यांची रोजगारक्षमता लक्षणीयरीत्या वाढते. त्यामुळे AEDP हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना “शिकत असतानाच उद्योगाचा अनुभव” आणि “करिअरची लवकर सुरुवात” या दोन्ही संधी उपलब्ध करून देणारा एक प्रभावी आणि भविष्याभिमुख पर्याय ठरतो. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासोबत लगेच रोजगाराच्या संधी शोधायच्या आहेत, त्यांच्यासाठी AEDP हा सर्वोत्तम पर्याय आहे.

*२. बी.ए. अर्थशास्त्र (ऑनर्स)*

बी.ए. अर्थशास्त्र (ऑनर्स) हा चार वर्षांचा प्रगत पदवी अभ्यासक्रम असून विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र विषयातील सखोल आणि विशेषीकृत ज्ञान प्रदान करतो. नियमित पदवी अभ्यासक्रमाच्या तुलनेत ऑनर्स अभ्यासक्रमामध्ये विषयाचा अधिक व्यापक आणि सखोल अभ्यास केला जातो. विद्यार्थ्यांना सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, विकास अर्थशास्त्र, सार्वजनिक अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, अर्थमिती, वित्तीय प्रणाली आणि समकालीन आर्थिक प्रश्न यांसारख्या विषयांचे प्रगत ज्ञान प्राप्त होते.

हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक घडामोडींचे विश्लेषण करण्याची क्षमता, तार्किक विचारशक्ती, समंक समजून घेण्याची कौशल्ये आणि आर्थिक समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता विकसित करतो. आधुनिक अर्थव्यवस्थेत निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली सांख्यिकीय आणि परिमाणात्मक कौशल्ये विद्यार्थ्यांना प्राप्त होतात. याशिवाय, समंक विश्लेषक, वित्तीय बाजारपेठा, सार्वजनिक धोरणे आणि जागतिक अर्थव्यवस्था यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना बदलत्या आर्थिक वातावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम बनवतो.

ऑनर्स पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध होतात. ते एम.ए. अर्थशास्त्र, उपयोजित अर्थशास्त्र, अर्थमिती, सार्वजनिक धोरण, समंक विश्लेष, एमबीए किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वाटचाल करू शकतात. तसेच UPSC, MPSC, RBI, NABARD, बँकिंग सेवा, आर्थिक व सांख्यिकी सेवा यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठीही आणि रोजगाराच्या दृष्टीने बँकिंग, वित्तीय सेवा, बाजार संशोधन, व्यवसाय विश्लेषण, आर्थिक सल्लागार सेवा,समंक विश्लेषक आणि कॉर्पोरेट क्षेत्राकरिता हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरतो.

*३. बी.ए. अर्थशास्त्र (ऑनर्स विथ रिसर्च)*

बी.ए. अर्थशास्त्र (ऑनर्स विथ रिसर्च) हा अभ्यासक्रम अशा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे ज्यांना संशोधन, अध्यापन, धोरण विश्लेषण, विकास अध्ययन किंवा उच्च शिक्षण क्षेत्रात करिअर घडवायचे आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राचे सखोल ज्ञान मिळण्याबरोबरच संशोधनाची प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रक्रिया अनुभवण्याची संधी मिळते.

चौथ्या वर्षात विद्यार्थ्यांना संशोधनपद्धती (Research Methodology), प्रगत अर्थमिती (Advanced Econometrics), समंक विश्लेषण, धोरण विश्लेषण आणि संशोधन लेखन यांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना स्वतंत्र संशोधन प्रकल्प हाती घेऊन संशोधन प्रबंध (Dissertation) तयार करावा लागतो. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना समंक संकलन, क्षेत्रीय सर्वेक्षण, सांख्यिकीय विश्लेषण, निष्कर्ष मांडणी आणि अहवाल लेखन यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो.

या अभ्यासक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी स्वतःच्या संशोधनाद्वारे समाज, अर्थव्यवस्था आणि सार्वजनिक धोरणांशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास करू शकतात. कृषी, रोजगार, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, वित्तीय समावेशन, डिजिटल अर्थव्यवस्था, हवामान बदल, शाश्वत विकास, लॉजिस्टिक्स, सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि विदर्भाच्या आर्थिक विकासासारख्या विषयांवर संशोधन करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. ऑनर्स विथ रिसर्च पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना संशोधन संस्था, थिंक टँक, सार्वजनिक धोरण संस्था, विकास संस्था, आंतरराष्ट्रीय संघटना आणि विद्यापीठीय संशोधन प्रकल्पांमध्ये काम करण्याच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध होतात. तसेच UGC च्या विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पीएच.डी.च्या दिशेने पुढे जाण्यासाठी मजबूत पाया उपलब्ध करून देतो.

आजच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत संशोधन, समंक विश्लेषण आणि पुराव्यावर आधारित धोरणनिर्मिती यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ऑनर्स विथ रिसर्च हा पर्याय विद्यार्थ्यांना केवळ रोजगारासाठी नव्हे तर ज्ञाननिर्मिती, संशोधन नेतृत्व आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संधींसाठीही सक्षम बनवतो. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना भविष्यातील संशोधक, धोरण विश्लेषक, प्राध्यापक, आर्थिक सल्लागार आणि विकास तज्ज्ञ म्हणून घडविण्याची क्षमता ठेवतो.

विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाची आवश्यकता

विदर्भ हा कृषीप्रधान प्रदेश असून येथे कृषी, ग्रामीण विकास, औद्योगिक वाढ, रोजगारनिर्मिती, लॉजिस्टिक्स, खनिज संसाधने, ऊर्जा क्षेत्र आणि मानवी विकास यांसारख्या अनेक आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करण्याची गरज आहे. या प्रदेशाच्या विकासासाठी स्थानिक समस्यांची जाण असलेले आणि त्यावर संशोधन व धोरणात्मक उपाय सुचवू शकणारे प्रशिक्षित अर्थशास्त्रज्ञ आवश्यक आहेत.

हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना केवळ राष्ट्रीयच नव्हे तर विदर्भाच्या विकासाशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास करण्याची संधी देईल. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक विकासासाठी योगदान देण्याची क्षमता विकसित होईल. प्रादेशिक विकासासाठी आर्थिक विश्लेषण आणि धोरणनिर्मिती महत्त्वाची मानली जाते.

*विदर्भाला होणारे फायदे*

या कार्यक्रमामुळे विदर्भातील आर्थिक, सामाजिक आणि विकासविषयक प्रश्नांवर स्थानिक स्तरावर संशोधन वाढेल. कृषी, ग्रामीण विकास, उद्योग, रोजगार, महिला सक्षमीकरण, वित्तीय समावेशन, लॉजिस्टिक्स, ऊर्जा आणि मानवी विकास यांसारख्या विषयांवर अभ्यास आणि धोरणात्मक सूचना उपलब्ध होतील.

स्थानिक उद्योग, बँका, स्वयंसेवी संस्था आणि शासन विभागांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणामुळे प्रदेशाच्या विकासासाठी आवश्यक असलेले मानवी भांडवल (Human Capital) निर्माण होईल. प्रादेशिक विकासामध्ये शिक्षण, कौशल्ये आणि संशोधन यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा बी.ए. अर्थशास्त्र (AEDP / ऑनर्स / ऑनर्स विथ रिसर्च) हा अभ्यासक्रम केवळ पदवी प्रदान करणारा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य, उद्योग-अनुभव, संशोधन क्षमता आणि रोजगारक्षमतेने परिपूर्ण करणारा एक सर्वसमावेशक शैक्षणिक उपक्रम आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने विकसित करण्यात आलेला हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रोजगार, उच्च शिक्षण, संशोधन आणि स्पर्धा परीक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये सक्षम बनविणारा आहे. विशेषतः विदर्भातील विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर गुणवत्तापूर्ण, उद्योगाभिमुख आणि संशोधनाधारित शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आधुनिक अर्थव्यवस्था, डेटा विश्लेषण, सार्वजनिक धोरणे आणि विकास क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेता, बी.ए. अर्थशास्त्र हा विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया ठरेल.

अधिक माहितीकरिता अर्थशास्त्र विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर किंवा विद्यापीठाच्या www.nagpuruniversity.ac.in या संकेत स्थळावर संपर्क साधता येईल.

The post बी.ए. अर्थशास्त्र : Data Science, AI आणि रोजगाराच्या नव्या संधींकडे नेणारा भविष्याभिमुख अभ्यासक्रम appeared first on Berar Times.

भंडाऱ्याची डॉ. नमीरा सिद्दीकी ‘नीट एमडीएस’ परीक्षेत देशात पहिली!
भंडारा : वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात विदर्भाने अभिमान बाळगावा अशी कामगिरी भंडाऱ्याच्या मुलीने केली आहे. नागपूरच्या दंत महाविद्यालयातून बीडीएसची पदवी मिळालेल्या डॉ. नमीरा सिद्दीकी यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत संपूर्ण देशातून पहिला क्रमांक पटकाविला आहे. डॉ. नमीरा यांनी ‘नीट एमडीएस’ प्रवेश परीक्षेत देशभरातील ३१ हजार विद्यार्थ्यांमधून सर्वाधिक ८०२ गुण प्राप्त करीत प्रथम ऑल इंडिया रँक प्राप्त केली आहे.

मूळच्या भंडारा शहरातील रहिवासी डॉ.नमीरा सिद्दीकी यांचे वडील मो. गालिब सिद्दीकी यांचा भंडाऱ्यात सुपर मार्केटचा व्यवसाय आहे. त्यांनी वानाडोंगरी, हिंगणा येथील स्व. दादासाहेब काळमेघ दंत महाविद्यालयातून बीडीएस पदवी प्राप्त केली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांचे बीडीएस पूर्ण झाले. त्यानंतर त्याच महाविद्यालयात त्यांनी मार्च २०२६ मध्ये एक वर्षाची इंटर्नशीपही पूर्ण केली. इंटर्नशीपच्या काळातच त्यांनी ‘नीट एमडीएस’ची तयारी सुरू केली हाेती. ही प्रवेश परीक्षा २ मे २०२६ रोजी पार पडली, ज्यामध्ये देशभरातून ३१,४०७ दंत चिकित्सक सहभागी झाले होते.

मूळच्या भंडारा शहरातील रहिवासी डॉ.नमीरा सिद्दीकी यांचे वडील मो. गालिब सिद्दीकी यांचा भंडाऱ्यात सुपर मार्केटचा व्यवसाय आहे. त्यांनी वानाडोंगरी, हिंगणा येथील स्व. दादासाहेब काळमेघ दंत महाविद्यालयातून बीडीएस पदवी प्राप्त केली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांचे बीडीएस पूर्ण झाले. त्यानंतर त्याच महाविद्यालयात त्यांनी मार्च २०२६ मध्ये एक वर्षाची इंटर्नशीपही पूर्ण केली. इंटर्नशीपच्या काळातच त्यांनी ‘नीट एमडीएस’ची तयारी सुरू केली हाेती. ही प्रवेश परीक्षा २ मे २०२६ रोजी पार पडली, ज्यामध्ये देशभरातून ३१,४०७ दंत चिकित्सक सहभागी झाले होते.

मंगळवारी या परीक्षेचा निकाल लागला आणि सिद्दीकी कुटुंबात आनंद पसरला. डॉ. नमीरा यांनी एकूण ९६० पैकी ८०२ गुण प्राप्त करीत देशात टॉप केले. डॉ. नमीरा यांना या अत्युच्च यशासाठी प्रचंड मेहनत करावी लागली.इंटर्नशीपदरम्यान वेळ मिळाला की लायब्ररीत अभ्यास आणि घरी आल्यानंतर पुन्हा रात्रभर अभ्यास करायच्या. २४ तासात केवळ दोन ते तीन तासाची झोप घेत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यापुढे दिल्लीच्या मौलाना आझाद दंत महाविद्यालयातून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या यशाने भंडारा, आणि विदर्भासाठीही गर्वाचा क्षण दिला आहे.

देशातून पहिला क्रमांक मिळणे हा अत्याधिक आनंदाचा क्षण आहे. मेहनत घेतली की त्याचे फळ निश्चितच मिळते, या गाेष्टीवर विश्वास दृढ झाला आहे. मी ज्या व्यवसायात आहे, त्यात दयाळूपणा अत्यंत आवश्यक आहे, कारण गरजू माणसे तुमच्यावर भरवसा ठेवून येत असतात. या विश्वासाला तडा जाणार नाही, यासाठीच मी पुढच्या आयुष्यात प्रयत्न करणार आहे. – डॉ. नमीरा मो. गालिब सिद्दीकी, ऑल इंडिया टॉपर

The post भंडाऱ्याची डॉ. नमीरा सिद्दीकी ‘नीट एमडीएस’ परीक्षेत देशात पहिली! appeared first on Berar Times.

मुख्याध्यापिका रेखा पटले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार
भडंगा येथे निरोप समारंभ

गोरेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, भडंगा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापिका रेखा पुरणलाल पटले ह्या ३१ मे रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्या. त्यानिमित्त भडंगा येथे त्यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ उत्साहात पार पडला. सन १९८८ पासून सलग ३८ वर्षे त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव या वेळी करण्यात आला.

रेखा पटले यांनी सन १९८८ मध्ये भंडारा जिल्हा परिषदेच्या मोहाडी पंचायत समिती अंतर्गत ‘ऊसर्रा’ या गावी सहाय्यक शिक्षिका म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये त्यांनी सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक ते उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदापर्यंत त्यांनी प्रत्येक जबाबदारी समर्थपणे सांभाळली. निरोप समारंभादरम्यान उपस्थितांनी रेखा पटले यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘त्यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व सर्वगुणसंपन्न आहे. त्यांच्याविषयी बोलताना शब्द अपुरे पडतात. त्यांच्या निवृत्तीने शिक्षण क्षेत्रातील एक मार्गदर्शक ऊर्जास्थान आज सेवानिवृत्त झाल्या. समारंभाच्या शेवटी भडंगा शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वृंद, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी रेखा पटले व त्यांच्या परिवाराचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.

The post मुख्याध्यापिका रेखा पटले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार appeared first on Berar Times.

एआयसीटीई मान्यताप्राप्त बांबु टेक्नॉलॉजी;डिप्लोमाकरीता चंद्रपुरातील बीआरटीसीला मंजुरी
Ø बीआरटीसी ठरली भारतातील पहिली संस्था

चंद्रपूर, दि. 31 : शाश्वत विकास, हरित उद्योग आणि बांबू आधारित तांत्रिक शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राने ऐतिहासिक झेप घेतली असून चिचपल्ली येथील बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर (बीआरटीसी) ला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), नवी दिल्ली यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून तीन वर्षीय ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’ अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे.

या मान्यतेमुळे बीआरटीसी हे भारतातील बांबू टेक्नॉलॉजी विषयातील स्वतंत्र डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी एआयसीटीई मान्यता मिळवणारी पहिली संस्था ठरली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई), मुंबई संलग्न या अभ्यासक्रमासाठी 60 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता मंजूर करण्यात आली आहे. ही मान्यता महाराष्ट्रातील बांबू उद्योग, हरित तंत्रज्ञान, शाश्वत रोजगार आणि ग्रामीण औद्योगिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

बीआरटीसीमध्ये 2017 पासून राज्य मान्यताप्राप्त बांबू टेक्नॉलॉजी डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू असून आता एआयसीटीई मान्यता मिळाल्यामुळे या अभ्यासक्रमाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे बांबू क्षेत्रातील तांत्रिक शिक्षणाला नवी दिशा मिळणार असून विद्यार्थ्यांसाठी रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

नवीन अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना बांबू प्रक्रिया तंत्रज्ञान, ट्रीटमेंट, फर्निचर निर्मिती, बांबू बांधकाम तंत्रज्ञान, हस्तकला, नर्सरी व्यवस्थापन, उत्पादन डिझाईन, उद्योजकता विकास आणि उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. बीआरटीसीमधील अत्याधुनिक कार्यशाळा, ट्रीटमेंट प्लांट, यंत्रसामग्री, संशोधन सुविधा आणि क्षेत्रीय प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय बांबू अभियान आणि महाराष्ट्र शासनाच्या नवीन बांबू धोरणामुळे देशात बांबू आधारित उद्योगांना चालना मिळत असून प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हा अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

बीआरटीसीचे संचालक मनोजकुमार खैरनार म्हणाले, एआयसीटीई कडून प्राप्त झालेली ही मान्यता बीआरटीसी, चंद्रपूर आणि संपूर्ण बांबू क्षेत्रासाठी अभिमानास्पद उपलब्धी आहे. शाश्वत विकास, हरित उद्योग, ग्रामीण रोजगार आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान क्षेत्रात बांबूचे महत्त्व वाढत असून या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कुशल तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया डीटीई/सीएपी च्या माध्यमातून होणार असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व भोजन सुविधा उपलब्ध आहेत. प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी इच्छुकांनी बीआरटीसी, चिचपल्ली, चंद्रपूर येथे तसेच https://brtc.org.in किंवा 95527 29996 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे बांबु संशोधन प्रशिक्षण संस्थेने कळविले आहे.

The post एआयसीटीई मान्यताप्राप्त बांबु टेक्नॉलॉजी;डिप्लोमाकरीता चंद्रपुरातील बीआरटीसीला मंजुरी appeared first on Berar Times.

गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे विमानाने ‘दिल्ली उड्डाण’; संसद भवन आणि राष्ट्रपती भवनाला देणार भेट!
सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळांतील १२० विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल

गडचिरोली,दि. 29 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसह त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध संस्थांची प्रत्यक्ष माहिती मिळावी या उद्देशाने 120 विद्यार्थ्यांची दिल्ली येथे विमानाद्वारे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे.

29 मे ते 1 जून 2026 या कालावधीत आयोजित या सहलीसाठी विद्यार्थ्यांनी आज नागपूर विमानतळावरून दिल्लीकडे प्रस्थान केले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांना विमानतळावरून रवाना केले.

या उपक्रमांतर्गत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या दौऱ्यात सिरोंचा येथील निवासी शाळेतील ४० विद्यार्थिनी, तर वांगेपल्ली आणि नवेगाव येथील निवासी शाळांमधील प्रत्येकी ४० विद्यार्थी अशा एकूण १२० विद्यार्थ्यांना या शैक्षणिक दौऱ्याची संधी मिळाली आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांसाठी हा पहिलाच विमानप्रवास असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला.

दिल्ली दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनाला भेट देण्याची तसेच देशाच्या संसदीय लोकशाहीचे केंद्र असलेल्या संसद भवनाच्या कार्यपद्धतीची माहिती जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय दिल्लीतील विविध ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन देशाचा इतिहास, संस्कृती आणि वारसा यांविषयी प्रत्यक्ष माहिती घेता येणार आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यामध्ये मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा निर्माण करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

The post गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे विमानाने ‘दिल्ली उड्डाण’; संसद भवन आणि राष्ट्रपती भवनाला देणार भेट! appeared first on Berar Times.

रखरखत्या उन्हात नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा
सालेकसा : सध्या ‘नवतपा’ सुरू असल्याने सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. जिल्हयातील तापमानाचा पारा ४५ ते ४६ अंश सेल्सिअसच्या पार गेला असतानाच, दुसरीकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू आहेत. या भीषण उकाड्यात आणि रखरखत्या उन्हात परीक्षा केंद्रे गाठताना विद्यार्थ्यांच्या जीवाची अक्षरशः लाही लाही होत आहे. यामुळे आरोग्याचा मोठा धोका लक्षात घेता या परीक्षा तातडीने पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होऊ लागली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत बी. एस्सी. (उन्हाळी २०२६) च्या सहाय्या सत्राच्या परीक्षा २६ मे पासून सुरू झाल्या असून त्या २३ जूनपर्यंत चालणार आहेत. विशेष म्हणजे, या परीक्षेची वेळ भर दुपारी २.३० ते ५.३० अशी ठेवण्यात आली आहे. नियमानुसार विद्यार्थ्यांना दुपारी २.०० वाजताच परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागते. नेमक्या याच वेळी उन्हाचा तडाखा आणि उभेडा सर्वाधिक असतो. ग्रामीण व निमशहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी सायकलने किंवा दुचाकीने प्रवास करावा लागतो. ४५ अंशांपेक्षा अधिक तापमानात भर दुपारी अशा प्रवास केल्याने विद्यार्थ्यांना उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागत आहेत. उपतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासन नागरिकांना दुपारी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे, तर दुसरीकडे विद्यापीठ मात्र ऐन उन्हाळ्यात दुपारी परीक्षा घेत आहे. हा विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ असल्याचा संतत आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि बदलत्या हवामानाची गंभीर दखल घेत, विद्यापीठ प्रशासनाने या परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलाव्यात, अशी आग्रही मागणी आता जोर धरत आहे.

The post रखरखत्या उन्हात नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा appeared first on Berar Times.

शिक्षकांचे पाच लाखांपर्यंतचे उपचार ‘आभा’ कार्डमधून
शिक्षण उपसंचालकांचे पत्र: अनुदानित शाळांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना निर्देश

गोंदिया : राज्यातील जिल्हा परिषद व १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट (आभा) कार्ड काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापुढे संबंधित कर्मचाऱ्यांचे पाच लाखापर्यतचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक स्वीकारले जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

शासनाच्या २५ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खासगी १०० टक्के अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करून त्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार, शुभ्र शिधापत्रिकाधारकांसह राज्यातील सर्व अधिवासी नागरिकांना विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत प्रति कुटुंब दरवर्षी पाच लाखांपर्यतचे आरोग्य संरक्षण लाभ दिले जात आहेत.

कॅशलेस वैद्यकीय सेवा

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश झाल्याने कॅशलेस वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी राज्यातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक कर्मचाऱ्यांनी तातडीने आभा कार्ड काढून घ्यावे, असे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी काढले आहे.

The post शिक्षकांचे पाच लाखांपर्यंतचे उपचार ‘आभा’ कार्डमधून appeared first on Berar Times.

डी.एल.एङ प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरूवात
अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचा स्वतःचा Email ID असणे बंधनकारक

भंडारा,दि.25:शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ साठी डी.एल. एङ प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या सविस्तर सुचना, प्रथम वर्ष प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांचे www.maa.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

१. शासकीय कोटयातील प्रवेशासाठी दि.१1 मे 2026 ते ०१ जून २०२६ या कालावधी पर्यंत www. maa. ac.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झालेली आहे.

२. अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचा स्वतःचा Email ID असणे बंधनकारक आहे.

३. प्रवेश अर्ज शुल्क खुला संवर्ग रूपये २००/-, खुला संवर्ग वगळून अन्य मागास संवर्गासाठी रूपये १००/-असे राहील.

४. उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज करावयाचा असेल तर प्रत्येक माध्यमाच्या संवर्गानुसार स्वतंत्र आवेदनपत्र व शुल्क भरावे लागेल.

५. प्रवेश अर्ज शुल्क स्विकारण्याची पध्दती प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन स्विकारले जातील.

६. प्रवेश पात्रता प्रवेशास इच्छुक असणारे कला, वाणिज्य, विज्ञान व एम.सी.व्ही.सी. शाखेतील पात्र उमेदवार इयत्ता बारावी खुल्या संवर्गासाठी किमान ४९.५० टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी किमान ४४.५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

७. व्यवस्थापन कोट्यातुन प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे.

८. प्रवेशाबाबतचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिध्द केले जाईल.

याबाबत वर्तमानपत्रात पुन्हा स्वतंत्र जाहिरात दिली जाणार नाही. त्यासाठी उमेदवाराने वेळोवेळी संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.

The post डी.एल.एङ प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरूवात appeared first on Berar Times.