रोजगार/व्यापार Archives - Berar Times

नागपुरातील कौशल्य विकास विद्यापीठासाठी जागेचा निर्णय महिनाभरात-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पारडी परिसरात उभारण्यात आलेल्या नागपूर स्कील सेंटरचे उद्घाटन

नागपूर, दि. २६ – जिल्ह्यातील प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठासाठीच्या जागेचा निर्णय महिनाभरात होणार असून हे विद्यापीठ देशातील सर्वोत्तम असे कौशल्य विकास विद्यापीठ ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केली.

विदर्भातील उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने नागपुरात पारडी परिसरात एआयडी, टाटा स्ट्राईव्ह, नागपूर महानगर पालिका आणि विदर्भ ग्लोबल फाउंडेशनच्या संयुक्त प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या नागपूर स्किल सेंटरच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे बोलत होते. केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हथीबेड, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, संजय भेंडे, डॉ. राजीव पोतदार, माजी खासदार अजय संचेती, स्थाई समिती अध्यक्ष शिवानी दाणी, महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर हे मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शिक्षणाच्या माध्यमातून युवकांना कौशल्य कितपत आत्मसात करता येते आणि रोजगाराच्या दृष्टीने त्याचा कितपत उपयोग होतो, याचा पूर्वी विचार झाला नव्हता. २०१४ पासून खऱ्या अर्थाने कौशल्य विकास या विषयाला महत्त्व देण्याचे धोरण राबविण्यात आले. आज उद्योग आणि व्यवसायात रोजगाराच्या दृष्टीने कौशल्य विकासाला अत्यंत महत्त्व आले आहे. एकीकडे युवकांपुढे रोजगाराची समस्या असताना दुसरीकडे उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याची अडचण होती. रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना त्यांचा लाभ स्थानिक युवकांना घेता यावा, या दृष्टीने कौशल्य विकास केंद्राची कल्पना पुढे आली असल्याचे ते म्हणाले.

विदर्भात मोठ्या प्रमाणात सोलर, इलेक्ट्रीक वाहन, आरोग्य तसेच लोहखनिज प्रकल्पांची इकोसिस्टीम आकारास येत असल्याच्या पार्श्वभूमीवर या उद्योगांना मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. या विचारातूनच कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठाच्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार व आधुनिक गरजांना साजेसे असे कुशल मनुष्यबळ तयार होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, युवकांना सध्या जे कौशल्य प्रशिक्षण दिले जातेय, त्यातून ७५ टक्के युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचे ध्येय बाळगले पाहिजे. त्या दृष्टीने सर्वच स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

विदर्भातील युवकांना मोठा लाभ होईल-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कौशल्य विकास केंद्र आणि प्रस्तावित असलेल्या कौशल्य विकास विद्यापीठामुळे रोजगारक्षम बनण्याच्या दृष्टीने विदर्भातील युवकांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल आणि उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोहखनिज उद्योगांत गुंतवणूक येत आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील उद्योग नागपूर व विदर्भात येत असून या उद्योगांना स्थानिक पातळीवरच कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास केंद्राची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. विदर्भातील मुलांना या सुविधांचा निश्चितच मोठा लाभ होणार आहे, असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवादही साधला. कार्यक्रमात एआयडीच्या वतीने वतीने चंद्रपूर किंवा गडचिरोली जिल्ह्यात एकात्मिक पोलाद उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठीचे एक स्वारस्यपत्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याशिवाय असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि नॅशनल अकॅडमी फॉर डिफेन्स प्रॉडक्शन यांच्यात यावेळी एका सामंजस्य कराराची देवाणघेवाणही पार पडली. स्थायी समितीच्या अध्यक्ष शिवानी दाणी, महापालिकेचे आयुक्त डॉ विपिन इटनकर, असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशीष काळे, टाटा स्ट्राईव्हचे अमेय वंजारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

असे आहे केंद्र

या आधुनिक स्किल सेंटरमध्ये दरवर्षी सुमारे २ हजार युवकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता आहे. उद्योगांच्या गरजेनुसार रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, प्लेसमेंट सहाय्य आणि उद्योजकता विकास या माध्यमातून युवकांना रोजगारक्षम बनविण्याचा या केंद्राचा उद्देश आहे. केंद्रात दहावी आणि बारावी तसेच पदवीधर युवक-युवतींसाठी निःशुल्क विविध अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अनेक अभ्यासक्रमांमध्ये ऑन-द-जॉब प्रशिक्षण, तसेच संगणक आणि इंग्रजी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

The post नागपुरातील कौशल्य विकास विद्यापीठासाठी जागेचा निर्णय महिनाभरात-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on Berar Times.

कौशल्य विकासाला गती; महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने स्किल सेंटर उभारणीचा निर्णय
गोंदिया, दि.24 : जिल्ह्यातील तरुणांसाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने स्किल सेंटर उभारण्याचा निर्णय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे आणि संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया येथे महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने ट्रॅक्टर स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधताना व्यवस्थापक लेवीस डॉन यांनी माहिती देत सांगितले की, येत्या काळात हे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असून येथे ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक प्रशिक्षण दिले जाईल. या माध्यमातून जिल्ह्यात कुशल प्रशिक्षणार्थी तयार होऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. विशेष म्हणजे, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र उमेदवारांना महिंद्रा कंपनीत नोकरीची संधीही दिली जाणार आहे.

महिंद्रा कंपनीसोबत होणाऱ्या कराराअंतर्गत दरवर्षी 120 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार असून हा करार तीन वर्षांसाठी असणार आहे. यावेळी प्रशिक्षणार्थींना आवश्यक सोयी-सुविधा शासकीय तंत्रनिकेतन येथे उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.तसेच, बैठकीत इन्क्युबेशन व बिझनेस फॅसिलिटेशन सेंटरच्या कार्यप्रणाली, उद्दिष्टे, उपलब्ध सुविधा व भावी उपक्रमांबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली. नवउद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून मदत केली जाणार असून, जिल्ह्यातील 59 महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी 90 मिनिटांचे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

याशिवाय, आत्मसमर्पित नक्षलवादी तसेच नक्षलपीडित व्यक्तींना नव साक्षर योजना अंतर्गत साक्षर करून कौशल्य विकासाद्वारे त्यांचे पुनर्वसन करण्यावर विशेष भर देण्यात आला.बैठकीत जिल्ह्याच्या कौशल्य विकास आराखड्यावर चर्चा करून सन 2026-27 साठी किमान कौशल्य विकास कार्यक्रमास मंजुरी देण्यात आली.या सर्व उपक्रमांमुळे गोंदिया जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन कौशल्य विकासाच्या क्षेत्रात जिल्हा अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

The post कौशल्य विकासाला गती; महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने स्किल सेंटर उभारणीचा निर्णय appeared first on Berar Times.

बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी प्रकल्प आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण उत्साहात
वाशिम, दि. 20 जुलै  : राज्य शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) २.० अंतर्गत महिला बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा, या उद्देशाने सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याबाबत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र, वाशिम येथे उत्साहात पार पडला.

प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकल्प संचालक (आत्मा) अनिसा महाबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी महिला बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषीपूरक उद्योग, मूल्यवर्धन, कृषी यांत्रिकीकरण आणि सामूहिक उद्योजकतेच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधण्यासाठी दर्जेदार व व्यवहार्य प्रकल्प आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सक्षम व सुयोग्य प्रकल्प आराखडा हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रशिक्षणाचे प्रास्ताविक नोडल अधिकारी लक्ष्मण सावंत यांनी केले. त्यांनी प्रशिक्षणामागील उद्दिष्टे स्पष्ट करताना बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी योग्य नियोजनासह प्रकल्प तयार करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

सनदी लेखापाल मारोती भोयार यांनी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याची प्रक्रिया, आर्थिक व्यवहार्यता, बँक कर्जासाठी आवश्यक निकष, वित्तीय नियोजन तसेच कर्ज प्रस्ताव तयार करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हा विकास व्यवस्थापक (नाबार्ड) शंकर कोकडवार यांनी कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत उपलब्ध कर्ज, अनुदान आणि व्याज सवलतींची माहिती देत या योजनेचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

अक्षय वैराळे यांनी कृषी औजार बँक उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक बाबी, यंत्रसामग्रीची निवड, व्यवस्थापन व कार्यपद्धती याविषयी माहिती दिली. तसेच पोकरा प्रकल्पातील प्रापण तज्ज्ञांनी शासकीय प्रापण प्रक्रियेतील नियम, कार्यपद्धती आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली.

प्रकल्प विशेषज्ञ (कृषी व्यवसाय) सोहम बेलोकर यांनी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याची पद्धत, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, प्रकल्प मंजुरीची कार्यपद्धती तसेच प्रस्ताव सादर करताना घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. सहभागी प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

या प्रशिक्षणास जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे पदाधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणामुळे सहभागी प्रतिनिधींना प्रकल्प आराखडा तयार करणे, आर्थिक नियोजन, बँक कर्ज, कृषी पायाभूत सुविधा निधी, कृषी औजार बँक तसेच प्रापण प्रक्रिया याविषयी उपयुक्त व व्यवहार्य मार्गदर्शन मिळाले.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प विशेषज्ञ (मनुष्यबळ विकास) प्रदीप पवार, राजेश कोकाट आणि रुपेश सरकटे यांनी विशेष सहकार्य केले.

The post बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी प्रकल्प आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण उत्साहात appeared first on Berar Times.

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी एक वर्षाचा कृती आराखडा राबवा; स्थानिक उद्योगांना प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
अँसिलरी उद्योग, ‘ब्रँड गडचिरोली’, निर्यात वाढ आणि ग्रामीण उद्योजकतेवर भर

मोठ्या उद्योगांना साहित्य पुरवणारे लघु किंवा मध्यम उद्योग.

गडचिरोली, दि. १७ जुलै :गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती देण्यासाठी पुढील एका वर्षात मोठ्या उद्योगांना साहित्य पुरवणारे (अँसिलरी) उद्योग, स्थानिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, ग्रामीण उद्योजकता आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या विकासाचा ठोस कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यात यावा. मोठ्या उद्योगांसोबत स्थानिक उद्योजकांची मजबूत पुरवठा साखळी निर्माण करून रोजगारनिर्मितीला चालना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समिती, आजारी उद्योग पुनर्वसन समिती, स्थानिक रोजगार समिती तसेच जिल्हा निर्यात प्रोत्साहन समितीच्या संयुक्त बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बैठकीत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (VIA), लॉईड्स मेटल्सचे प्रतिनिधी, स्थानिक उद्योजक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत अँसिलरी डेव्हलपमेंट रोडमॅप, जिल्हा निर्यात कृती आराखडा, स्थानिक रोजगार, उद्योग भवन, ॲडव्हांटेज विदर्भ आणि नवउद्योजकांना सहाय्य या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

तीन महिन्यांत अँसिलरी उद्योगांचे सर्वेक्षण; एका वर्षात प्रत्यक्ष परिणाम दिसले पाहिजेत

जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, जिल्ह्यात उभारणी होत असलेल्या मोठ्या स्टील उद्योगांमुळे स्थानिक उद्योगांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील तीन महिन्यांत संभाव्य अँसिलरी उद्योगांचे संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण करून एका वर्षात प्रत्यक्ष उद्योग उभे राहतील, यासाठी नियोजनबद्ध काम करावे. विद्यमान जमीन, इमारत व वित्तपुरवठ्याची क्षमता असलेल्या उद्योगांना अँसिलरी उद्योगांमध्ये प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

The post गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी एक वर्षाचा कृती आराखडा राबवा; स्थानिक उद्योगांना प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा appeared first on Berar Times.

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त खामगावात रोजगार मेळावा; १८९ उमेदवारांची प्राथमिक निवड
बुलढाणा, दि. 16 : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर बुलढाणा, जिल्हा उद्योग केंद्र आणि जी.एस. कॉलेज खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खामगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात ४४६ उमेदवारांनी विविध कंपन्यांच्या पदांसाठी मुलाखती दिल्या असून त्यापैकी १८९ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी रोजगार मेळावा जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष संजय चेके, समन्वय सदस्य दिलीप शेटे, जी.एस. कॉलेजचे प्राचार्य डॉ. तळवणकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या रोजगार मेळाव्याला स्थानिक युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध आस्थापनांमधील उपलब्ध पदांसाठी उमेदवारांनी मुलाखती दिल्या. ४४६ उमेदवारांपैकी १८९ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी विविध शासकीय महामंडळांचे माहिती स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) आणि प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) याबाबत माहिती व नोंदणीसाठी विशेष मार्गदर्शन केंद्रही कार्यरत होते.

जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रोजगार मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

The post जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त खामगावात रोजगार मेळावा; १८९ उमेदवारांची प्राथमिक निवड appeared first on Berar Times.

आदिवासी युवकांसाठी सुवर्णसंधी: देवरी येथे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण!
गोंदिया:आदिवासी जमातीमधील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना शासकीय सेवेत रोजगाराची संधी मिळावी या उद्देशाने, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, देवरी (जि. गोंदिया) तर्फे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या दुसऱ्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण १ ऑगस्ट ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चालणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून २५ जुलै २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

📌 महत्त्वाच्या बाबी आणि पात्रता:

शैक्षणिक पात्रता: किमान १० वी उत्तीर्ण (उच्च शिक्षण, टायपिंग किंवा संगणक कोर्स असणाऱ्यांना प्राधान्य).

वय व रहिवासी: वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे. उमेदवार गोंदिया किंवा भंडारा जिल्ह्याचा रहिवासी असावा.

मानधन: निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा १,००0/- रुपये विद्यावेतन (Stipend) दिले जाईल.

राहण्याची सोय: उमेदवारांना देवरी येथे राहण्याची व्यवस्था स्वतःच करावी लागेल.

📄 आवश्यक कागदपत्रे:

अर्जदारांनी अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला (LC), जातीचे प्रमाणपत्र, रोजगार कार्यालयाचे ऑनलाईन नोंदणी कार्ड, बँक पासबुक आणि आधार कार्डच्या छायांकित प्रती (झेरॉक्स) जोडणे अनिवार्य आहे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:

इच्छुकांनी कार्यालयीन वेळेत (07199) 295168 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन अधिकाऱ्यांनी केले आहे.

बेरार टाईम्स डिजिटल न्यूज | आपल्या हक्काचे माध्यम

The post आदिवासी युवकांसाठी सुवर्णसंधी: देवरी येथे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण! appeared first on Berar Times.

AOP गोठणगाव येथे निःशुल्क पोलिस भरती पूर्व प्रशिक्षणास सुरुवात !
गोंदिया,दि.०७ः जिल्हा पोलीसाच्या दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत पोलीस अधीक्षक गोरख भामरे,अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे संकल्पनेतून आदिवासी व दुर्गम भागामध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी एओपी गोठणगाव येथे प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. सदरचे प्रशिक्षण सर्वांसाठी मोफत असल्याने परिसरातील गरजू विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन AOP प्रभारी पोलीस उपनिरीक्षक निळकंठ गित्ते यांनी केले आहे. मागील वर्षी एओपी गोठणगाव येथे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण 10 विद्यार्थ्यांची शासनाच्या विविध विभागामध्ये निवड झाली आहे. त्यामध्ये संध्या ईश्वार (लातूर पोलिस),अरमान राणे (कोल्हापूर पोलिस),अभय लाडे (मीरा भाईंदर पोलिस),चंद्रशेखर मेश्राम(एम. एस. एफ.),अंकित जांभूळकर (भंडारा पोलिस),दिवाकर उरकुडे (नागपूर पोलिस),निलेश आळे (एस.आर.पी.एफ. चंद्रपूर),मिलिंद उके (अग्निवीर),ब्रिजेश रामटेके (आरोग्य विभाग)व महिमा कुंभारे (मुंबई पोलिस) असे गुणवंत विद्यार्थी आहेत.

सध्या चालू असलेल्या प्रशिक्षणामध्ये पोलिस भरती पूर्व अंतर वर्ग प्रशिक्षण व सराव पेपर घेऊन लेखी परीक्षेची तयारी पोउपनि निळकंठ गित्ते व पोलीस शिपाई अभिजित इटेकर हे करुन घेतात.तर पोलिस हवालदार सचिन घरोटे हे बाह्य वर्ग प्रशिक्षण देऊन मैदानी परीक्षेचा सराव करुन घेतात. सदर प्रशिक्षणाचा बेरोजगार युवक- युवतींना लाभ होत असून परिसरातील नागरिकांकडून रोजगाराभिमुख उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

The post AOP गोठणगाव येथे निःशुल्क पोलिस भरती पूर्व प्रशिक्षणास सुरुवात ! appeared first on Berar Times.

लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स एंड एंटरप्रेन्योरशिपच्या माध्यमातून रोजगाराची संधी-अमृता फडणविस
गडचिरोली :लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स एंड एंटरप्रेन्योरशिपच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जात असून एवढ्या मोठा उदार मनाचे उद्योजक आपण पहिल्यांदाच बघत आहोत.लायडसचे प्रभाकरणजी यांचे काम मी कोरोना काळापासून बघत आहे.लाडसंने रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच उच्च शिक्षण आणि आरोग्याची सेवा देण्याकरीता रुग्णालय सुरु केल्याचे आपण हेडरीला बघितल्याचे समाजसेविका अमृता फडणवीस यांनी सांगितले.त्या पुढे म्हणाल्या.सावित्रीबाई फुलेनी शिक्षणाची ज्योत लावली ती ज्योत लॉयड्सच्या मुली पुढे नेत आहेत. हा विकास महिला सक्षमीकरणाचा आहे याचा मला अभिमान वाटतो. आज गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्यामुळे जिल्हयाचा खरा विकास होत आहे. देशाची प्रगती खऱ्या अथनि खेळ्यापासुनच होते हेच मिशन घेऊन प्रभाकरण कार्य करीत आहेत.

लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स एंड एंटरप्रेन्योरशिपच्यावतीने बोदली येथे दिक्षांत कार्यक्रम मुख्य अतिथी म्हणून अमृता फडणविस उपस्थित होत्या.दीक्षांत समारोहाला प्रमुख अतिथी संचालक बि. प्रभाकरण,लोकप्रतिनिधी अरविंद सावकार पोरड्डीवार,संचालिका किर्ती रेड्डी, अल्का अरोरा, व्यांकटेशजी आदिची उपस्थिती होती.आपल्या प्रास्ताविक भाषणातून बि प्रभाकरण यांनी सांगीतले की लॉयड्स एड मेटल हि गडचिरोली जिल्हयातील संस्था असुन या संस्थेतुन रोजगार मिळावा म्हणुन या संस्थेद्वारे १० हजार युवक – युवतींना प्रशिक्षण दिले जाते.इथेच शिकायच व रोजगारांसाठी बाहेर पडायच हाच संकल्प घेऊन आजच्या घडीला ३०० विध्यार्थी निशुल्क प्रशिक्षण पूर्ण केले असुन पुन्हा ७०० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. हे प्रशिक्षणार्थी उद्याचा सक्षम भारत घडविणार आहेत यात शंकाच नाही असे प्रास्ताविकातून प्रभाकरण यांनी सांगितले.

The post लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स एंड एंटरप्रेन्योरशिपच्या माध्यमातून रोजगाराची संधी-अमृता फडणविस appeared first on Berar Times.

सौंदड येथे विदर्भ अग्रो एजंसीच्या कुबोटा शोरुमचे थाटात उदघाटन
गोंदिया,दि.२७ः जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ट्रक्टर नगरी असलेल्या सौंदड(रेल्वे)येथे नुकतेच विदर्भ अग्रो एजन्सीच्या कुबोटा शोरुन उदघाटन व प्रात्यक्षिक सोहळा उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाकरीता विशेष पाहुणे म्हणून श्रीमंत डॉ. मुधोजीराजे भोसले

महाराजा ऑफ नागपुर,परिणय फुके सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद,सुनीलभाऊ फुंडे अध्यक्ष, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक,प्रफुल्ल गुडधे पाटील काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष,प्रशांत पवार प्रदेश प्रवक्ते, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,निलेश कानवडे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,हर्ष मोदी, सरपंच सौंदड,कौशल आनंद मॅनेजिंग डाइरेक्टर धर्मशिला बेल्टींग प्रा. लि.,

राज कंवर गर्ग जनरल मॅनेजर धर्मशिला बेल्टींग प्रा. लि.,राजन चुघ, चीफ ऑफिसर एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड,आशुतोष देशमुख, एसोशिएट वाइस प्रेसिडेंट एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड,सचिन राजमाने, झोनल बिजनेस मॅनेजर एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड,विष्णु राठोड, हेड अॅग्री सोल्युशन बिजनेस,अभिषेक कुमार, झोनल सेल्स मॅनेजर अॅग्री सोल्युशन बिजनेस,नीळकंठ राठोड, रिजनल बिजनेस मॅनेजर एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड,ब्रजेश तिवारी, रिजनल सर्व्हिस मॅनेजर एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी परिसरातून आलेल्या शेतकरी बांधवाना उच्चशक्तीच्या ट्रक्टरचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.तसेच खरेदी केलेल्या शेतकयाना ट्रक्ट्ररचे वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता  विदर्भ अॅग्रो एजन्सीज, सौंदड चे एलेटी राजा व पंकज इंगळे यांनी परिश्रम घेतले.

The post सौंदड येथे विदर्भ अग्रो एजंसीच्या कुबोटा शोरुमचे थाटात उदघाटन appeared first on Berar Times.

कमी खर्चात कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी
वाशिम, दि.११ जुन : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मंगरूळपीर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून इच्छुक विद्यार्थ्यांनी विविध अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी व्यवसायांमध्ये प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा प्राचार्य, शासकीय आयटीआय मंगरूळपीर एस. व्ही. नखाते यांनी केले आहे.

शासकीय आयटीआय ही अत्यंत कमी खर्चात दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण देणारी आणि रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी यशस्वी शासकीय योजना आहे. अनेक दशकांपासून हजारो युवक-युवतींना तांत्रिक कौशल्ये प्रदान करून त्यांना उद्योग, व्यवसाय आणि सेवाक्षेत्रात यशस्वीपणे स्थिर होण्यास मदत केली आहे.प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी आधार कार्डवरील माहितीनुसार admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह आयटीआयमध्ये उपस्थित राहून अर्ज निश्चित (कन्फर्म) करावा, असे संस्थेचे प्रवेश प्रमुख आर. पी. सोनोने यांनी सांगितले.

यावर्षी संस्थेमध्ये अभियांत्रिकी तसेच बिगर अभियांत्रिकी व्यवसायांसाठी एकूण २५६ जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना विविध कौशल्याधारित व्यवसायांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी माहितीपत्रके संस्थेत ठेवण्यात आली आहेत. विजतंत्री, सौर ऊर्जा तंत्रज्ञान, मोटार मेकॅनिक यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाधारित व्यवसायांना सध्या मोठी मागणी असून इतरही अनेक रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांना योग्य व्यवसाय निवडता यावा आणि प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी संस्थेत दररोज सकाळी १० ते ११ या वेळेत विशेष मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत विविध व्यवसायांची माहिती, रोजगाराच्या संधी आणि प्रवेश प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जात असल्याचे प्राचार्य एस. व्ही. नखाते यांनी सांगितले.तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन वेळेत प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

The post कमी खर्चात कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी appeared first on Berar Times.