राजकीय Archives - Berar Times

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे-मनसेची संयुक्त पत्रकार परिषद; तिरंगा मार्चचे विजयोत्सवात रूपांतर
मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सादर केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर तीव्र टीका केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे कौतुक करत हा विजय देशातील तरुणांचा असल्याचे म्हटले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून देशातील वातावरण अस्वस्थ होते. अभिजीत दिपके, आंदोलनात सहभागी झालेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सातत्याने लढा दिल्यामुळे हा टप्पा गाठता आला. मात्र हा संघर्ष केवळ एका मंत्र्यांच्या राजीनाम्यापुरता मर्यादित नसून, गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रश्नांवर जनतेत असलेल्या नाराजीचे हे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी नमूद केले.

राजीनाम्याबाबत अद्याप संभ्रम असल्याचे सांगत ठाकरे म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांनी खरोखर राजीनामा दिला आहे की त्यांचा केवळ खातेबदल झाला आहे, याबाबत अधिकृत स्पष्टता आवश्यक आहे. त्यांनी राजीनाम्याचे पत्र सार्वजनिक केले असले तरी त्यानंतरच्या निर्णयाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि महिलांशी झालेल्या गैरवर्तनाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी या घटनांवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांसह साध्या वेशातील कथित व्यक्तींनी केलेल्या कारवायांची चौकशी व्हावी, तसेच विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, असे ते म्हणाले. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

युवाशक्ती एकत्र आली तर मोठा बदल घडवून आणू शकते, याचे हे उदाहरण असल्याचे ठाकरे म्हणाले. देशातील तरुणांनी आपल्या संघर्षातून लोकशाहीतील जनशक्तीचे सामर्थ्य दाखवून दिले असून, देशात क्रांतीची ठिणगी अद्याप जिवंत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेत मनसेच्या वतीनेही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे अभिनंदन करण्यात आले. देशभरातील तरुणांनी आपल्या संघर्षातून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा दावा करत, हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी २६ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा मार्चचे रूपांतर विजयोत्सव सोहळ्यात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. पूर्वनियोजित वेळेनुसार सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे सर्वांनी एकत्र जमावे, असे आवाहन करण्यात आले. पुढील आंदोलनाची दिशा अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निश्चित करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

The post धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे-मनसेची संयुक्त पत्रकार परिषद; तिरंगा मार्चचे विजयोत्सवात रूपांतर appeared first on Berar Times.

विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत ; हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी- राहुल गांधी
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे सांगत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांनी लोकशाही व संविधानाच्या चौकटीत राहून दिलेल्या लढ्याचे कौतुक करत त्यांनी या घडामोडीला शिक्षण व्यवस्थेतील बदलाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले.

राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स (X) अकाऊंटवर प्रतिक्रिया व्यक्त करत, देशाच्या भविष्याचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरून ठाम भूमिका घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी आणि तरुणाचा देशवासीयांना अभिमान वाटला पाहिजे, असे नमूद केले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे स्वागत करताना त्यांनी दोन प्रमुख मागण्या अद्याप प्रलंबित असल्याचे स्पष्ट केले. पहिली म्हणजे, पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या भविष्याचा सन्मान राखत देशाची माफी मागावी. दुसरी म्हणजे, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

केंद्र सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी, मजूर आणि गरीब वर्गावर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला आणि या सर्वांनी आपल्या स्वाभिमानासाठी घटनात्मक मार्गाने एकत्र येऊन ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत राहुल गांधी म्हणाले की, लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्यानंतर मध्यरात्री ‘रील्स’ बनवून वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देणे आवश्यक आहे. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा एक टप्पा असला तरी दोषींवर कारवाई आणि पंतप्रधानांची माफी याशिवाय दुसरे कोणतेही समाधान स्वीकारले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या संदेशाच्या शेवटी राहुल गांधी यांनी देशातील नागरिकांना “घाबरू नका” असे आवाहन करत, या सरकारला सत्तेतून हटवण्याची वेळ आता आली असल्याचा दावा केला.

The post विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत ; हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी- राहुल गांधी appeared first on Berar Times.

NEET पेपरफुटी आणि राहुल गांधींच्या अटकेचा गोंदियात भडका; काँग्रेसचा रस्त्यावर ठिय्या, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
गोंदिया: NEET परीक्षेतील पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील वाढलेली अनागोंदी आणि दिल्लीत न्याय मागणारे विद्यार्थी-युवकांवर झालेला अमानुष लाठीचार्ज, या घटनांच्या निषेधार्थ आज गोंदियात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षाच्या इतर खासदारांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ गोंदिया जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज शहरात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मोर्चाचे ठळक मुद्दे:

भोला भवन ते तहसील कार्यालय: हा निषेध मोर्चा शहरातील भोला भवन येथून सुरू झाला आणि तहसील कार्यालयावर धडकला.

जयस्तंभ चौकात ठिय्या: मोर्चा जयस्तंभ चौकात पोहोचताच संतप्त काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

गगनभेदी घोषणाबाजी: “केंद्रातील भाजप सरकारचा धिक्कार असो”, “शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या”, अशा गगनभेदी घोषणांनी गोंदिया शहर दणाणून सोडले.

सरकारवर जोरदार टीकास्त्र यावेळी बोलताना काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या आणि शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडवणाऱ्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. तसेच, संसदेत आणि रस्त्यावर जनतेचा आवाज उठवणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हुकूमशाही प्रवृत्तीचा असल्याचा घणाघातही कार्यकर्त्यांनी केला.

प्रशासनाला निवेदन जयस्तंभ चौकातील ठिय्या आंदोलनानंतर हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. तिथे काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या कारवाया थांबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, युवक काँग्रेस आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

The post NEET पेपरफुटी आणि राहुल गांधींच्या अटकेचा गोंदियात भडका; काँग्रेसचा रस्त्यावर ठिय्या, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी appeared first on Berar Times.

लोकनेते स्व.अजित दादा पवार यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात
गोंदिया-राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेता स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून खासदार प्रफुल पटेल व खासदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 22 ते 28 जुलै या दरम्यान जनसेवा सप्ताहाचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आले आहे.आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे आदरणीय स्वर्गीय अजितदादांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आदरणीय दादांच्या शिस्तप्रिय, विकासप्रेमी, लोकोपयोगी व जनसेवेच्या कार्यावर उपस्थित प्रमुख मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

आदरणीय दादांच्या विचारांनी प्रेरित ज्येष्ठ नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, देवेंद्रनाथ चौबे, प्रदेश सचिव विनोद हरिणखेडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी सर्वश्री अशोक शहारे, राजलक्ष्मी तुरकर, विशाल शेंडे, शहर अध्यक्ष नानू मुदलियार, माधुरी नासरे, शिव शर्मा, केतन तुरकर, सतीश देशमुख, भगत ठकरानी, राज शुक्ला, कुंदा दोनोडे, रुचिता चव्हाण, छोटू पंचबुद्धे, राजेश दवे, आनंद ठाकूर, खालीद पठाण, लखन बहेलिया, झनकलाल ढेकवार, टी एम पटले, विष्णू शर्मा, हरिराम आसवाणी, राकेश डोडवाणी, दीपक मूलसंधानी, विनायक गजघाट, इमरान शेख, हरबक्ष गुरुनानी, हर्षवर्धन मेश्राम, शैलेश वासनिक, चंचल चौबे, आरडी अग्रवाल, सचिन अवस्थी, सुनील पटले, धरमलाल रहांगडाले, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, दिलीप डोंगरे, बिट्टू सोनपुरे, जितेंद्र येडे, श्रेयस खोब्रागडे, लव माटे, किरण कावडे, योगेश दर्वे, प्रदीप लांजेवार, अशोक चुटे, सुरेश पटले, सी एच हनवते, तुषार उके, रवी रामटेककर, संजीव बापट, टी तुरकर, योगेंद्र कुमार जैतवार, भजेंद्र तुरकर, विष्णू ढेकवार, सुरजलाल पटले, चांदोराव बिसेन, राजा जैन, गेंदलाल तुरकर, सुखनंदन तुरकर, देवेंद्र तुरकर, विजय साहू, त्रिलोक तुरकर, वामन गेडाम, चिराग बावनथडे सहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post लोकनेते स्व.अजित दादा पवार यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात appeared first on Berar Times.

गडचिरोली हे सत्ताधाऱ्यांसाठी ‘सोने की चिडिया’ झाले आहे-अंबादास दानवे यांचे सरकारवर टिकास्र
गडचिरोली : एकीकडे मोठ्या उद्योगांसाठी या जिल्ह्यात सरकारकडून पायघड्या घातल्या जात आहे. गडचिरोलीच्या नावावर लूट करण्याचा प्रकार सुरू आहे. हा जिल्हा ‘सोने की चिडिया’ झाला आहे, पण तो लोकांसाठी नाही तर केवळ सत्ताधाऱ्यांसाठी, अशी टिका शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. गुरूवारी संध्याकाळी ते गडचिरोलीत माध्यमांशी बोलत होते.येत्या 18 जुलै रोजी नागपुरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आयोजित रामरक्षा आंदोलनाची माहिती देण्यासाठी आणि पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दानवे संध्याकाळी गडचिरोलीत आले होते.

यावेळी दानवे म्हणाले, मोठमोठ्या कंपन्या येऊन या जिल्ह्यात मनमानी करत आहेत. आदिवासींच्या जमिनी लाटल्या जात आहेत. आदिवासींना कोणत्याच प्रकारचे संरक्षण आणि न्याय मिळत नाही, ही गडचिरोलीची अवस्था आहे. या जिल्ह्यातील विविध प्रश्न जसेच्या तसे कायम आहेत. त्यामुळे येथील प्रश्नांवर आम्ही येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात किंवा त्यापूर्वी आवाज उठवू, मोठा मोर्चा काढू, अशी माहिती यावेळी दानवे यांनी दिली.

रस्ते चांगले नाही, विमानतळ कशासाठी?

गडचिरोलीतील प्रस्तावित विमानतळासाठी शेतजमिनी देण्यास होत असलेल्या विरोधावर शिवसेनेची भूमिका मांडताना अंबादास दानवे म्हणाले, गडचिरोलीत अद्याप चांगले रस्ते नाहीत, मग ते करण्याऐवजी विमानतळ कशासाठी? असा सवाल त्यांनी केला. आज बहुतांश जिल्ह्याच्या ठिकाणचे विमानतळ बंद आहेत. विमानतळाच्या परिसरातील जागा आधी उद्योगपतींनी लाटायच्या आणि नंतर त्या चढ्या दराने सरकारने विकत घ्यायच्या ही कार्यपद्धती राज्यात सुरू असल्याचे ते म्हणाले.या पत्रपरिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पवन गेडाम व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पत्रपरिषदेनंतर अंबादास दानवे यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

The post गडचिरोली हे सत्ताधाऱ्यांसाठी ‘सोने की चिडिया’ झाले आहे-अंबादास दानवे यांचे सरकारवर टिकास्र appeared first on Berar Times.

मोहाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी पदावर बाणा सव्वाालिखे तर उपसभापती पदावर आशा बोंद्रे यांची वर्णी
मोहाडी पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडीत सभापतीपदी बाणा सव्वालिखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसभापतीपदी आशा बोंद्रे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे मोहाडी तालुक्यातील विकासकामांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

The post मोहाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी पदावर बाणा सव्वाालिखे तर उपसभापती पदावर आशा बोंद्रे यांची वर्णी appeared first on Berar Times.

स्व.अजितदादा पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश
​मुंबई दि.15 : – राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याचे नेते स्व. अजित अनंतराव पवार (दादा) यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै, २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले असून, यामुळे दादांच्या लोकसेवेचा आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा राज्य शासनाकडून गौरव करण्यात आला आहे.

​परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, स्व. अजित अनंतराव पवार यांची जयंती २२ जुलै, २०२६ (बुधवार) रोजी राज्यभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाईल. ​सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही होणार आयोजन* ​हा आदेश केवळ मंत्रालयापुरता मर्यादित नसून, राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसह सर्व शाळा व महाविद्यालयांनाही लागू करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या भागातील सर्व यंत्रणांमध्ये या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

*​योगदानाचा आणि लोकसेवेचा सन्मान* ​स्व. अजित दादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रशासनावर ठेवलेली मजबूत पकड, पायाभूत सुविधांचा विकास आणि लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेले परिश्रम यांमुळे त्यांना जनमानसात हक्काचे ‘दादा’ म्हणून स्थान मिळाले. शासनाचा हा निर्णय म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाला आणि त्यांच्या अविरत कार्यपद्धतीला दिलेली ही एक मोठी आदरांजली मानली जात आहे.यामुळे आता दरवर्षी २२ जुलै रोजी शासकीय स्तरावर दादांच्या लोकसेवेचा वारसा अधिकृतपणे आठवला जाईल

The post स्व.अजितदादा पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश appeared first on Berar Times.

क्षेत्राच्या विकासात दोन्ही जनप्रतिनिधीची भूमिका महत्वाची ठरणार – खा.प्रफुल पटेल
खासदार राजेंद्र जैन व आमदार अविनाश ब्राह्मणकर यांचा जाहीर सत्कार थाटात

भंडारा,दि.११- आपल्या आशीर्वादाने केंद्र व राज्यात महायुतीची डब्बल इंजिनची सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून विकासाला गति मिळाली आहे. राज्यातील शेतकरी आर्थिक डबघाईस जाऊ नये यासाठी कर्जमुक्ती योजनेची अंबलबजावणी केली जात आहे शिवाय जेव्हा जेव्हा शेतकरी असो किव्हा सर्वसामान्य नागरिक किंबहुना भगिनी अडचणीत आल्या तेव्हा महायुतीची सरकार त्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभी राहत आहे. हे सर्वांग प्रगतीच्या पाहुलखुणा आहेत. महायुतीने विदर्भाला मान देऊन तुमच्यातला प्रतिनिधी राजेंद्र जैन यांना राज्यसभेत तर सर्वसामान्य म्हणून ओळख असलेला अविनाश ब्राह्मणकर यांना महायुतीने विधान परिषदेत संधी दिली आहे. या दोन्ही जनप्रतिनिधींना मिळालेली संधी म्हणजेच गोंदिया भंडारा सह पूर्व विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी महत्वाचे ठरणार असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

भंडारा येथे महायुती सत्कार समितीच्या वतीने राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन व विधानपरिषदेचे आमदार अविनाश ब्राह्मणकर यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल तर उदघाटक म्हणून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले तर प्रमुख अतिथी म्हणून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर, आमदार डॉ परिणय फुके तसेच आमदार राजकुमार बडोले, आमदार विजय रहांगडाले, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजूभाऊ कारेमोरे, आमदार संजय पुराम,  वीरेंद्र अंजनकर,लायकराम भेंडारकर,सुनील फुंडे,धनंजय दलाल आदी मान्यवर उपस्थित होते.सत्कार सोहळा प्रसंगी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील महायुतीचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ता तसेच विविध संघटनांचे, सेल, आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post क्षेत्राच्या विकासात दोन्ही जनप्रतिनिधीची भूमिका महत्वाची ठरणार – खा.प्रफुल पटेल appeared first on Berar Times.

तिरोड्यात नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांचा जल्लोषात भव्य स्वागत व जाहीर नागरी सत्कार
तिरोडा : स्व. अटल बिहारी वाजपेयी सभागृह, तिरोडा येथे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांचा तिरोडा शहर व ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी बोलतांना खासदार राजेंद्र जैन यांनी आपल्या राजकीय प्रवासात खासदार प्रफुल पटेल यांचे नेतृत्व, मार्गदर्शन, विश्वासाचे, व निष्ठेचे फळ मला मिळाले असून, त्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि जनतेने व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रामाणिकपणे कार्यरत राहीन अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रेम, सन्मान व शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार मानले. “आपण सर्वांनी दिलेले प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे.भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी मोठ्या संख्येने तिरोडा तालुक्यातील वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ता तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post तिरोड्यात नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांचा जल्लोषात भव्य स्वागत व जाहीर नागरी सत्कार appeared first on Berar Times.

राज्यातील सर्व सरकारी विभागांमधील बहुजनांसाठी राखीव जागा तात्काळ भरा!
बसपचे माजी प्रदेशाध्यक्ष, बहुजन नेते ऍड.संदीप ताजने यांची मागणी

नागपूर-राज्यातील विविध शासकीय, निमशासकीय विभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग प्रवर्गातील शेकडो पदे रिक्त आहेत. बहुजन समाजातील सुशिक्षत तरुण रोजगारासाठी वणवण फिरत असताना, हक्काच्या आरक्षित जागा वर्षांनुवर्षे रिक्त ठेवल्या जात असल्याबद्दल बहुजन समाज पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि बहुजन नेते ऍड.संदीप ताजने यांनी तीव्र संपात व्यक्त केला आहे. या सर्व जागा तात्काळ भरण्यासाठी सरकारने मेगा भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी आग्रही मागणी करीत बहुजनांनी यासाठी एकत्रित येण्याचे आवाहन ऍड.ताजने यांनी केले आहे.

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नुसार समोर आलेल्या माहितीनूसार नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रोद्योगिकी संस्थान अर्थात व्हीएनआयटी येथे प्राध्यापक व इतर संवर्गात मागासवर्गीयांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याची आकडेवारी समोर आली आहे.आकडेवारीनूसार ‘एससी’साठी नियमानुसार मंजूर ४८ जागांपैकी केवळ २८ जागा भरल्या गेल्या असून तब्बल २० जागा (४१.६७%) रिक्त आहेत. ‘एसटी’साठी मंजूर २३ पैकी ९ जागा भरल्या असून १४ जागा (६०.८७%) रिक्त आहे.तर, ‘ओबीसी’साठी ८९ जागांपैकी ४३3 जागा भरल्या असून ४६ जागा (५१.६९%) रिक्त आहेत.

केंद्रीय शैक्षणिक संस्था (शिक्षकांच्या केडरमधील आरक्षण) कायदा, २०१९ लागू झाल्यानंतरही राष्ट्रीय स्तरावरील आणि राज्यातील शैक्षणिक व प्रशासकीय संस्थांमध्ये मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व अत्यंत नगण्य ठेवले गेले आहे. व्हीएनआयटीसारख्या नामांकित संस्थेत जर अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींच्या ५० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त असतील, तर राज्यातील इतर सरकारी विभागांची परिस्थिती याहून भयानक असल्याचे ऍड.ताजने म्हणाले.

राज्य शासनाच्या विविध ६५ हून अधिक विभागांमध्ये मागासवर्गीयांचा मोठा अनुशेष (Backlog) प्रलंबित आहे. यामुळे बहुजन समाजातील लाखो पात्र आणि गुणवंत उमेदवार वयोमर्यादा संपण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. राज्यातील सर्व विभागांमधील SC, ST आणि OBC प्रवर्गाच्या रिक्त जागांचा अनुशेष तात्काळ विशेष मोहिमेद्वारे भरण्यात यावा.कंत्<wbr />राटी नोकरभरती बंद करून सर्व रिक्त जागांवर कायमस्वरूपी ‘मेगा भरती’ प्रक्रिया तात्काळ सुरू करावी आणि प्रत्येक विभागाची सुधारित ‘बिंदू नामावली’ (Roster Register) सार्वजनिक करून पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी यानिमित्ताने ऍड.ताजने यांनी केली आहे.

The post राज्यातील सर्व सरकारी विभागांमधील बहुजनांसाठी राखीव जागा तात्काळ भरा! appeared first on Berar Times.