क्रीडा Archives - Berar Times

गुरिंदरवीरने रचला नवा राष्ट्रीय विक्रम, फेडरेशन कपमध्ये सुवर्णपदक
रांची,दि.२५ मे: रांची येथे पार पडलेल्या फेडरेशन कप अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय धावपटूंनी वेगाची नवी परिभाषाच लिहिली. पंजाबच्या गुरिंदरवीर सिंगने पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत केवळ सुवर्णपदक जिंकले नाही, तर भारतीय अॅथलेटिक्सच्या इतिहासात अभूतपूर्व असा विक्रम नोंदवत देशातील सर्वात वेगवान धावपटू बनण्याचा मान पटकावला.

शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत गुरिंदरवीरने १०.०९ सेकंदांची वादळी धाव घेत ‘१०.१० सेकंद’ ही भारतीय स्प्रिंटमधील ऐतिहासिक मर्यादा प्रथमच पार केली. याआधी भारतातील कोणत्याही धावपटूला हा टप्पा गाठता आला नव्हता. त्यामुळे रांचीच्या ट्रॅकवर भारतीय अॅथलेटिक्ससाठी एक नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.

या स्पर्धेत ओडिशाचा अनिमेश कुजूरनेही शानदार कामगिरी करत १०.२० सेकंदांची वेळ नोंदवली आणि रौप्यपदक पटकावले. तर प्रणव प्रमोदने १०.२९ सेकंदांसह तिसरे स्थान मिळवले.

विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत गुरिंदरवीर आणि अनिमेश यांच्यात राष्ट्रीय विक्रमासाठी अक्षरशः चुरशीची लढत पाहायला मिळाली. २२ मे रोजी उपांत्य फेरीत गुरिंदरवीरने १०.१७ सेकंदांची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केला. पण काही मिनिटांतच अनिमेशने १०.१५ सेकंदांची धाव घेत तो विक्रम मोडीत काढला.

मात्र अंतिम फेरीत गुरिंदरवीरने जोरदार पुनरागमन करत सर्वांनाच मागे टाकले. १०.०९ सेकंदांची ऐतिहासिक वेळ नोंदवत त्याने राष्ट्रीय विक्रम पुन्हा आपल्या नावे केला आणि आगामी राष्ट्रकुल तसेच आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

The post गुरिंदरवीरने रचला नवा राष्ट्रीय विक्रम, फेडरेशन कपमध्ये सुवर्णपदक appeared first on Berar Times.

लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांची भव्य सांगता
गडचिरोली : लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग (LVPL)-2026 ची सांगता लॉयड्स स्पोर्ट्स ग्राउंड, हेडरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाली. ग्रामीण खेळाडूंचा सहभाग, थरारक क्रिकेट सामने आणि स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने वातावरण भारावून गेले होते. या क्रिकेट सामन्यांमुळे एटापल्ली परिसरातील ग्रामीण क्रीडा प्रतिभेला संधी मिळाली. तसेच क्रीडाभावना आणि एकात्मता वृद्धिंगत करणारा हा स्पर्धा सोहळा ठरला.अत्यंत रोमांचक अशा अंतिम सामन्यात बीसीसीसी आलदंडी संघाने टोडसा ट्रॉफी फायटर्स संघाचा 3 धावांनी रोमांचक पराभव करून LVPL 2026 ची ट्रॉफी पटकावली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा देताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन म्हणाले, “या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मी लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी आणि संपूर्ण आयोजन समितीचे अभिनंदन करतो. स्थानिक भागातील युवकांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जेणेकरून ते गडचिरोलीतून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा सादर करू शकतील, हा आमचा प्रयत्न राहिला आहे. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण स्तरावरील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन मिळेल आणि स्थानिक प्रतिभावंत खेळाडूंची ओळख होण्यास मदत होईल.”

विजेता संघ बीसीसीसी आलदंडी यांना ट्रॉफीसह ₹75,000 चे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले, तर उपविजेता टोडसा ट्रॉफी फायटर्स यांना ₹50,000, तर हेडरी हरिकेन्स संघाने तिसरे स्थान मिळवत ₹30,000 जिंकले, याशिवाय नेंदर इलेव्हन हिरोज संघाला चौथ्या स्थानासाठी ₹20,000 प्रदान करण्यात आले. उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचलेल्या संघांनाही त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रत्येकी ₹10,000 चे पारितोषिक देण्यात आले.

हेडरी हरिकेन्सचे प्रसन्नजीत सरकार यांना उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी “मॅन ऑफ द सिरीज” घोषित करण्यात आले आणि ₹10,000 चे पारितोषिक देण्यात आले. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट युवा खेळाडू आणि सामनावीर असे वैयक्तिक पुरस्कारही प्रत्येकी ₹3,000 रोख पारितोषिकासह प्रदान करण्यात आले.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या गावातील मान्यवर, पोलीस अधिकारी, स्वयंसेवक, सीएसआर टीम सदस्य, लॉयड्सच्या विविध विभागांचे कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचे आयोजकांनी आभार मानले.

The post लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांची भव्य सांगता appeared first on Berar Times.

उन्हाळी तायक्वांदो प्रशिक्षण शिबिराचा समारोप;100 खेळाडूंना प्रमाणपत्रांचे वितरण
गोंदिया, १० मे- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया, गोंदिया जिल्हा तायक्वांदो असोसिएशन आणि डीजीएम तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उन्हाळी तायक्वांदो क्रीडा प्रशिक्षण शिबिर 2025-26 चा उत्साहपूर्ण समारोप झाला. फुलचुरपेठ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे 26 एप्रिल ते 5 मे 2026 दरम्यान हे प्रशिक्षण शिबिर पार पडले.

शिबिरात सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंसाठी 8 मे रोजी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र शासनाचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते तथा गोंदिया जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे जिल्हा सचिव दुलीचंद मेश्राम तसेच परंपरागत युवा क्रीडा व खेळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय बिरणवार उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय भाषणात भोजराज चौधरी यांनी राज्य व केंद्र शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध क्रीडा सुविधांचा लाभ खेळाडूंनी घ्यावा, तसेच गोंदिया जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडून जिल्ह्याचे नाव उंचावावे, असे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनीही खेळाडूंना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रशिक्षण शिबिरात तब्बल 100 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुलीचंद मेश्राम यांनी केले, तर संचालन प्रशिक्षक कुसुम पटले यांनी केले. कुंजन डोये यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरगम वाघाडे, आदिती ब्रह्मपुरे, हिमांशू नाईक, पूर्वान्स राऊत आणि राहुल खोब्रागडे यांनी विशेष सहकार्य केले.

The post उन्हाळी तायक्वांदो प्रशिक्षण शिबिराचा समारोप;100 खेळाडूंना प्रमाणपत्रांचे वितरण appeared first on Berar Times.

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पुण्यात थाटात उद्घाटन
प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळण्यासाठी संघभावना महत्वाची-महावितरणचे संचालक राजेंद्र पवार

*पुणे, दि. ६ मे २०२६:* सर्व खेळाडूंना एकत्रितपणे, एकजुटीने व सहकार्याने खेळूनच विजयाला गवसणी घालावी लागते. त्यामुळे कोणत्याही संघात सर्वप्रथम संघभावना निर्माण झाली की प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळते. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रामुख्याने विद्युत कंपन्यांमधील खेळाडूंचा सहभाग व नावलौकीक वाढत आहे, ही अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी बुधवारी (दि. ६) केले.

बालेवाडी (पुणे) येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलच्या तीन दिवसीय क्रीडास्पर्धेला प्रारंभ झाला. महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्याहस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून या स्पर्धेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.)  सुनील काकडे, आयोजन समितीचे उपाध्यक्ष व मुख्य अभियंता अनिल कोलप (महापारेषण)व अशोक घाडगे, मुख्य अभियंता धनराज पेठकर, मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) भूषण कुलकर्णी , मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके (महावितरण) व पुरुषोत्तम वारजुरकर (महानिर्मिती), विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष जिग्नेश राय, सरचिटणीस नरेश कुमार, उपाध्यक्ष भरत पाटील, खजीनदार ललित गायकवाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

विद्युत नियंत्रण मंडळाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थाने देशातील सर्व विद्युत कंपन्यांच्या खेळाडूंचे हक्काचे व्यासपीठ बनले आहे. सर्व विद्युत कंपन्या आणि त्यांच्या उत्कृष्ट खेळाडूंना देशपातळीवर एकत्र आणण्यासाठी या मंडळाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असे गौरवोद्गार संचालक श्री. पवार यांनी काढले. प्रादेशिक संचालक सुनील काकडे यांनी सांगितले, की विद्युत क्षेत्र धकाधकीचे आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धेतून कर्मचारी मानसिक व शारीरिकदृष्ट्या कणखर बनतात. यासह त्यांच्या मैदानातील शिस्तीने कार्यालयातील कार्यक्षमतेत देखील वाढ होते.

अत्यंत नेत्रदीपक व उत्साहात झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात सर्व खेळाडूंनी संचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत विविध राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाचे खजिनदार ललित  गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संतोष पाटणी,  रामगोपाल अहीर, भक्ती जोशी, सोनाली बाविस्कर, स्वागती सोळंकुरे यांनी केले तर श्री. अशोक घाडगे यांनी आभार मानले.या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, हरियाणा, तेलंगाणा, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली आदी राज्यांतील सरकारी व खासगी विद्युत कंपन्यांचे ४१ संघ आणि सुमारे ५३८ महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत.

The post विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पुण्यात थाटात उद्घाटन appeared first on Berar Times.

संतोष बंधाटेना महाराष्ट्र स्टेट पॉवर लेफ्टिंगमध्ये सिल्वर व सिनियर मध्ये ब्रॅच मेडल
तिरोडा-नागपूर येथे महाराष्ट्र स्टेट पॉवर लेफ्टिंग स्पर्धा पार पाडलेल्या महाराष्ट्र स्टेट पाॅवर लेप्टिंगस्पर्धेमध्ये अदानी पाॅवर येथे कार्यरत संतोष ब्रह्मनंद बंधाटेनी मास्तर ग्रुपमध्ये सिल्वर मेडल आणि सिनियर ग्रुप 83+ मध्ये ब्रॅच मेडल पटकावले.

महाराष्ट्र राज्यातून 12 मास्तर ने भाग घेतला होता, त्या मध्ये संतोष बंधाटेने मास्तर मध्ये सिल्वर मेडल पटकावले.संतोष बंधाटे यांनी बेंच प्रेस वजन 110kg आणी बारबर्र कर्र मध्ये 60kg वजन उचलले टोटल वजन 170kg उचलून सिल्वर मेडल पटकावले.तसेच संतोष बंधाटे 85+ ओपन वजन सिनियर वेट मध्ये 3 रा क्रमांक पटकावले असे महाराष्ट्र स्टेट मध्ये दोन मेडल पटकावले.

संतोष बंधाटे हा अदानी पॉवर प्लन्ट मध्ये सेक्युरिटी STF मध्ये कार्यरत आहे तो MSF कंपनी STF मध्ये आहे.

अदानी पॉवर प्लॅन्ट चे सेक्युरिटी हेड सूर्यकांत कश्यप, हरीश ख्यानी, प्रदीप यादव, धीरज जोशी, भंडारा जिल्हा बॉडी बिल्डिंग अध्यक्ष डॉ. Prakash सिंग, विजय गणेशे, जयंत गणेशे, सतीश बंधाटे, कमलेश दमाहे, संतोष बोहोणे, राजू बंधाटे, सत्यम नंदागवळी, योगेश कांबळे, निलेश काटकर, ऍड. प्रमोद इलमे, मनोज शेंडे, तसेच डॉ. सुनील शिवप्रसाद कापगते, संजय मते, महेंद्र वहिले, राकेश वासनिक, श्रीधर साखरवाडे, यांनी अभिनंदन केले. संतोष बंधाटे ला सचिन मेश्राम, अतुल रोडगे, तुमसर निधी बँकेचे अध्यक्ष अरविंद थोटे, प्रकाश उमरकर, शैलेश रोडगे, समीर वंजारी, अजय बानासुरे, यांनी संतोष बंधाटे ला अभिनंदन केला. जून महिन्यात वेस्टन इंडिया स्पर्धा रायपूर येथे होणार आहे. संतोष बंधाटे महाराष्ट्र टीम कडून प्रतिनिधी करणार आहे, त्याचा मध्ये खेळण्याची तयारी आहे.

The post संतोष बंधाटेना महाराष्ट्र स्टेट पॉवर लेफ्टिंगमध्ये सिल्वर व सिनियर मध्ये ब्रॅच मेडल appeared first on Berar Times.

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे दि. 6 ते 8 मे पर्यंत पुण्यात आयोजन
कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलच्या स्पर्धेसाठी 41 संघ सहभागी होणार

नागपूर, दि. 4 मे 2026: अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या 47 व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलच्या क्रीडास्पर्धेचे आयोजन बुधवार (दि. 6) ते शुक्रवारपर्यंत (दि. 8) पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 10 राज्यांतील विविध विद्युत कंपन्यांचे पुरुष व महिला गटातील तब्बल 41 संघ सहभागी होत आहेत.

या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, हरियाणा, तेलंगाणा, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली आदी राज्यांतील सरकारी व खासगी विद्युत कंपन्यांचे 41 संघ आणि सुमारे 538 महिला व पुरुष खेळाडू सहभागी होत आहेत. कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलमध्ये पुरुष संघात लढत होईल तर कबड्डी व खो-खोमध्ये महिला संघांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील अजिंक्यपदासाठी कबड्डीमध्ये पुरुष व महिला गटातील 18 संघ तर खो-खोसाठी 9 संघ सहभागी होत आहेत. तसेच कुस्ती व बास्केटबॉलमध्ये अजिंक्यपदासाठी पुरुष गटामध्ये प्रत्येकी 7 संघांमध्ये लढत होणार आहे.

विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि. 6) सकाळी 9.30 वाजता राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या मुख्य उपस्थितीत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्र यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी राज्याच्या क्रीडा आयुक्त सौ. शीतल तेली-उगले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच महावितरण, महानिर्मीती, महापारेषण कंपनीच्या संचालक मंडळासह अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाचे अध्यक्ष जिग्नेश राय, सरचिटणीस नरेश कुमार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर शुक्रवारी (दि. 8) सायंकाळी 5 वाजता अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीवकुमार (महापारेषण) व राधाकृष्णन बी. (महानिर्मिती) यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरणाचा कार्यक्रम होईल.

महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून पुणे प्रादेशिक संचालक सुनील काकडे तसेच उपाध्यक्ष म्हणून मुख्य अभियंता अनिल कोलप (महापारेषण) व अधीक्षक अभियंता अशोक घाडगे (महानिर्मिती) आणि मुख्य समन्वयक म्हणून मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके (महावितरण) व पुरुषोत्तम वारजुरकर (महानिर्मिती) आणि विविध समितीचे प्रमुख व सदस्य कार्यरत आहेत.

The post विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे दि. 6 ते 8 मे पर्यंत पुण्यात आयोजन appeared first on Berar Times.

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 30 एप्रिल ते ४ मे या कालावधीत
नागपूर, दि.२९ – आपल्या राज्यामध्ये देशी खेळ प्रचंड लोकप्रिय आहेत. राज्यातील ग्रामीण व शहरी या दोन्ही विभागामध्ये कबड्डी हा खेळ खेळला जातो. त्यामुळेच महाराष्ट्राच्या गावा गावामध्ये या खेळाची लोकप्रियता प्रचंड असून ती दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात होणारी छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ही क्रीडा क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, मनपा क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर आदी उपस्थित होते.

30 एप्रिल ते ४ मे या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. १६ पुरुष व १६ महिला असे एकूण ३२ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे आयोजन उपसंचालक कार्यालय, क्रीडा व युवक सेवा. नागपूर विभाग, नागपूर व ऍमॅच्युअर असोसिएशन ऑफ कबड्डी तसेच नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून स्पर्धा कालावधी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी स्पर्धास्थळी भेट देणार असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान तब्बल १९ वर्षांनी नागपूर जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे. स्पर्धा उच्च दर्जाची व भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. नागपूर येथे आयोजित करण्यात येणारी ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा क्रीडाक्षेत्रासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले.

The post छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 30 एप्रिल ते ४ मे या कालावधीत appeared first on Berar Times.

विभागस्तरिय सांस्कृतिक कला व क्रिडा महोत्सवाचे बक्षिस वितरण समारोप
सडक अर्जुनी,दि.२४ एप्रिलः– इतर मागास बहुजन कल्याण विभागा अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील विनाभन आश्रमशाळांचे विभागस्तरिय सास्कृतिक, काला महोत्सवाचे आयोजन गडचिरोली येथे करण्यात आले होते. यासाठी दामाजी पाटील लंजे माध्यमिक व अशोक लंजे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळा सडक अर्जुनी जि, गोंदिया येथील विद्यार्थी, कर्मचारी व शिक्षक पाठविण्यात आले होते. सदर शाळेची निवड जिल्हास्तरावरुन करण्यात आली होती.

विभागस्तरिय कार्यक्रमाचे उद्‌घाटन सोहळा दिनांक २६ ते २८ डिसेंबर २०२५ ला पार पडला. या कार्यक्रमाचे उद्द्घाटक विजय वाकुळकर, प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग नागपूर व डॉ. सचिन मडावी सहा संचालक, गडचिरोली तसेच विशेष अतिथी  किशोर भोयर, सहा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, गोंदिया हया मान्यवराच्या उपस्थीतीत पार पडला. सदर स्पर्धेमध्ये गोंदिया माध्यमिक आश्रमशाळा संघ खो-खो मध्ये मूली प्रथम क्रमांक व कबडडी मध्ये मूले प्रथम क्रमांक पटकावला. नाटक स्पर्धेमध्ये निशांत महवंत सयाम हया दामाजी पाटील लेजे माध्यमिक आश्रमशाळा सडक अर्जुनी जि. गोंदिया ने प्रथम क्रमांक पटकावला. पा मध्ये सुशांत बावणे, साहोल बिसेन, मोहील भोयर, विशाल मडावी, कु. भारती चौधरी, कु.राणी भोगारे, कु. नंदिनी नेवारे यांचा समावेश आहे.

सदर कार्यक्रमाचे बक्षिस वितरण शाळेमध्ये अशोक लंजे, सचिव संजे शिक्षण संस्था, फुटाळा व संध्याताई लंजे, अध्यक्षा लेंगे शिक्षण संस्था फुटाळा / सौंदळ व मुख्याध्यापक के. के. पुस्तोडे, वाय. पी. बन्सोड प्राचार्य ओ. आर. बाय, कापगते सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व्हि. जी. गणविर, आर. एस. दोनोडे, एस.ए. राठोड, कू. जी. एम. गाबळ, एम.एन. गहाणे, पी.एच. गिन्ने, जे.टी. चिधालोरे, व्हि.पी. ओडे, कु.जे.टी. बुराडे, कि. जी. कोटांगाने.. बी. आर. मस्के, एम.एस. नेकाने ई. एस. देशमुख, वि.एस. निबेकर, डि.जी. भदाडे, व शिक्षकेत्तर कर्मचारी आर. एस. बाळबुध्देश्री. एस. सुर्यवंशी, एस. एस. कांबळे, ए. बी. फुल्लुके, एफ.ए. लटये. कु.जे.टी. नागलवाडे, व्हि. एफ. शेंडे, कु. ले. आर. जांभुळकर, एच. जी. पात्रे, बी. आर. मेश्राम, सी.सी. लांजेवार, एम.टी. हाडे, एस. पी. जतपेले उपस्थीतीत होते. काला, क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व विद्याथ्यांचे संपाचे व खेळाडुंचे टॉफी व मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मान्यवरांनी विद्याव्यांचे अभिनंदन करुन मार्गदर्शन केले.

The post विभागस्तरिय सांस्कृतिक कला व क्रिडा महोत्सवाचे बक्षिस वितरण समारोप appeared first on Berar Times.

बुलढाण्याच्या अथर्व ताठेची राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी
बुलढाणा , दि.17 : आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे 26 मार्च ते 7 एप्रिल 2026 दरम्यान पार पडलेल्या 15 वी NTPC चेचुकरी लेनिन ढोला स्मृती ‘मिनी’ (U-15), 7 वी ‘किड्स’ (U-10) व 2 री ‘किड्स’ (U-13) राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याच्या अथर्व देवानंद ताठे याने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचा मान उंचावला आहे.

अथर्व ताठे याने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत U-15 गटात देशभरातून चौथा क्रमांक पटकावला. तसेच कंपाऊंड बायडिंग प्रकारात महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवून देत राज्याच्या यशात मोलाचा वाटा उचलला. यापूर्वी सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत अथर्वने राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. सातत्यपूर्ण मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडली आहे.

अथर्वच्या या यशामागे आंतरराष्ट्रीय तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग (शिवबा आर्चरी अकॅडमी, बुलढाणा) यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्वने यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अथर्वच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याचा क्रीडा क्षेत्रात अभिमान उंचावला असून सर्व स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

The post बुलढाण्याच्या अथर्व ताठेची राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी appeared first on Berar Times.

पीसीयूच्या अथर्व भागवत याने राष्ट्रीय आर्म रेसलिंग मध्ये पटकावले रौप्य पदक
पिंपरी, पुणे– पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) मधील बी.एस्सी. न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स शाखेतील विद्यार्थी अथर्व अविनाश भागवत याने ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप २०२५-२६ मध्ये पुरुष विभागात ८५ किलो वजन गटात रौप्य पदक पटकावले.

अलिगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह विद्यापीठ येथे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत पीसीयू क्रीडा संचालक डॉ. विवेक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व भागवत याने हे यश संपादन केले. त्याचे अभिनंदन करताना पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे यांनी सांगितले की, पीसीयू मधील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम बरोबर क्षेत्रातच क्रीडा क्षेत्रासाठी देखील प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात त्यामुळेच पीसी मधील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धेत यश मिळवत आहेत.

पीसीयूच्या वतीने अथर्व भागवत याचा सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीइटी अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम, गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ गिरीश देसाई तसेच प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी, विभाग प्रमुख डॉ. रुचू कुथियाला यांनी अभिनंदन केले.

The post पीसीयूच्या अथर्व भागवत याने राष्ट्रीय आर्म रेसलिंग मध्ये पटकावले रौप्य पदक appeared first on Berar Times.