37.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे दोन ट्रक पकडले

कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे दोन ट्रक पकडले

0
319

गोंदिया,दि.23ः कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असलेले दोन ट्रक पकडण्यात आले. ट्रकमधून ३१ जनावरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणात एवूâण २४ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई २० व २१
सप्टेंबरच्या दरम्यानची आहे.
तिरोडा पोलीस गस्त घालत असताना एमएच ३५/एजे १६७७ ट्रकला अडविण्यात आले. दरम्यान ट्रकची पाहणी केली असता १५ बैल विना परवाना कोंबुन कत्तलीसाठी नेत असतांना दिसून आले.त्याचप्रमाणे ट्रक क्रमांक एमएच ५९/एटी ४९५३ मध्ये दहा गायी व सहा बैल असे एवूâण १ लाख १० हजार विंâमतीचे १६ जनावरे आढळून आले. दोन्ही
ट्रकमधून २ लाख ६० हजार रुपये विंâमतीचे ३१ जनावरांसह २४ लाख ६० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सहा आरोपींविरुध्द तिरोडा पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

blank