उभ्या ट्रकला कंटेनरची धडक,कंटेनरच्या चालकाचा मृत्यू

0
988

सुभाष सोनवाणे/देवरी,दि.29:-शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील राणी दुर्गावती चौकात आज गुरुवारला दुपारी 3 वाजेच्या सुमारास एका कंटेनरचालकाने उभ्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.रायपूरवरुन नागपूरकडे जात असलेल्या NL 01, K 5871 कन्टेनरच्या चालकाने NH – 6 वरील राणी दुर्गावती चौकासमोरील परीसरात विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या CG 08 AE 2110 या ट्रकला धडक दिली,यात धडकेत कंटेनर चालकाचा जागीच म्रुत्यू झाला.देवरी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून मृत चालकाचे नाव कळू शकलेले नव्हते.