लोधीटोला शिवारात पट्टेदार वाघाची शिकार,अवशेष बेपत्ता

0
1087

गोंदिया,दि.16 – शहरापासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या लोधीटोला (चुटीया) येथील पटले यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत पट्टेदार वाघाचे अवशेष आढळले. हे वाघाचे शरीराचे तुकडे-तुकडे करून वेगवेगळ्या शेतात टाकण्यात आल्याचा प्रकार  (दि.15) नोव्हेंबरच्या सायकांळला उघडकीस आला.लगेच त्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. लोधीटोला येथील शेतकरी अमरनाथ पटले यांच्या शेतात पट्टेदार वाघाचा मृतदेह पडला असल्याची माहिती गावकऱ्यांनी शेतकरी पटले यांना रविवारी सायंकाळी दिली. त्यांनी ही माहिती वनािधकाऱ्यांना देईपर्यंत रात्र झाली होती. आज (दि.१६) रोजी वनाधिकारी व वन्यप्रेमी लोधीटोला येथील पटले यांच्या शेतात गेले असतांना त्या शेतात पट्टेदार वाघाचे अवशेष वेगवेगळ्या ठिकाणी आठळले. १२ ते १५ दिवसापूर्वी वाघाची शिकार करून त्या वाघाचे अवशेष शेतात टाकल्याने वाघाचा शरीर कुजलेल्या अवस्थेत होता. त्या वाघाच्या शरीराचे तुकडे-तुकडे शेतात वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले होते. ते गोळा करण्यात आले. करंट लावून किंवा विष देऊन त्या वाघाची शिकार करण्यात आली असावी असा कयास लावला जात आहे. घटनास्थळावर उपवनसंरक्षक कुलराजसिंग, सहाय्यक उपवनसंरक्षक राजेंद्र सदगीर, आकरे, क्षेत्र सहाय्यक दखने वन्यजीवप्रेमी सावन बहेकार, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे व पशूधन वैद्यकीय अधिकारी,डाॅ.विवेक गजरे,डाॅ.ए.डी.जवलकर यांनी मृत वाघाची तपासणी करुन शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर संस्कार करण्यात आला. आरोपींचा शोध वनविभाग घेत आहे.