Home गुन्हेवार्ता उत्पादन सहायक निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

उत्पादन सहायक निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

0

यवतमाळ– लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्य उत्पादन विभागाच्या सहायक दुय्यम निरीक्षकास कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर 25 ऑगस्टच्या रात्री शाळेजवळ लाच घेताना रंगेहात पकडले. शंकर गोविंद घाटे असे पकडलेल्या कर्मचार्‍याचे नाव असून तो सहायक दुय्यम निरीक्षक आहे. तक्रारदारांना विदेशी मद्य परवाना संबंधित कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्याने लाच मागितली होती.
त्यात कारवाई न करण्यासाठी स्वत:साठी 6 हजार आणि या विभागाचे निरीक्षकांसाठी प्रतिमाह 6 हजार रुपये प्रमाणे 12 हजार मागितले होते. याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे देण्यात आली होती. त्या अनुषंगाने बुधवारी संध्याकाळी 7 वाजता जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारपाशी तक‘ारदाराकडून 12 हजार स्वीकारताना लाचलुचपत पथकाने शंकर घाटेला रंगेहात अटक केली. हा सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ विभागाचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट यांच्या नेतृत्वाखाली राहुल गेडाम, सचिन भोयर, महेश वाकोडे, राकेश सावसाकडे यांच्या पथकाने यशस्वी केली.

Exit mobile version