Home गुन्हेवार्ता बुलडाण्यात 40 किलो गांजा जप्त, आरोपी अटकेत

बुलडाण्यात 40 किलो गांजा जप्त, आरोपी अटकेत

0

बुलडाणा-जिल्ह्याच्या सीमेवरील मध्यप्रदेशमधून गांजाची राज्यातील इतर भागातही तस्करी केल्या जात आहे. गांज्याच्या व्यापाराला बुलडाणा शहर पोलिसांनी 2 सप्टेंबरच्या मध्यरात्री मुंबईला घेवून जाणारा 40 किलो गांजा पकडला आहे. आरोपी बारकू पटेलला ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक दिवसांपासून गांजाच्या व्यापाराबाबत पोलिसांकडे गुप्त माहिती होती. शहरातून मुंबईला एक जण गांजा घेवून जात असल्याची माहिती त्यांना काल मिळाली. त्यांनी तातडीने आपल्या पथकाला कारवाईसाठी सज्ज केले, पीएसआय अमित जाधव यांच्यावर जबाबदारी सोपविली. आरोपी सहकार विद्या मंदीरसमोरील प्रवासी निवान्याजवळ असून त्याच्याकडे गांजा आहे, ही माहिती होती.
पीएसआय अमित जाधव यांनी सहकार विद्या मंदीरजवळ सापळा रचला. आरोपी बारकू शंकर पटेल (वय 42) हा रात्री 1 वाजून 25मिनीटांनी त्याठिकाणी पोहोचला. सतर्क असलेल्या पोलिस पथकाने तात्काळ त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 40 किलो गांजा किंमत 2 लाख 80 हजार रूपये मिळून आला. अमित जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बारकू पटेल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई पोनि प्रदिप साळुंंके यांच्या मार्गदर्शनात अमित जाधव, लक्ष्मण कटक, महादेव इंगळे, दिलीप पवार, महादेव पेटकर, अमोल खराडे, सुनिल मोजे, उमेश भुते, सिमा गवई, राजेश गणेशे यांनी केली.

Exit mobile version