अवैध जुगार खेळणाऱ्या 15 इसमावर देवरी पोलीसांची कारवाई

0
128

चिचगड,दि.07: देवरी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या परसटोला भागात पोळ्याच्या दिवशी काही इसम जुगार खेळत असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत अवैधरित्या जुगार खेळणार्या 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेत 6 सप्टेंबरच्या रात्री 10 वाजेच्या सुमारास कारवाई केली.पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई परसटोला,देवरी येथे आफताब डेकोरेशन दुकानासमोरील चौकात करण्यात आली. घटनास्थळावरून 52 तासपत्ते, नगदी 1550/रु. तसेच आरोपीतांचे झडतीत 900/- रु नगदी, एक एम.आय कंपनीचा मोबाईल 5000/- रु. , असा एकुण 7450 /- रु.चा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी जुगार खेळतांना गजानन इतवारी सार्वे वय 22,अमोल अनिल बडोले वय 25,नितेश केशव कोहळे वय 32,वार्ड क्र. 5 मिळून आले तर बबलु मेश्राम,अनिल नेताम,विजय मेश्राम,अनिल सिरसाम,आशु ठाकरे,तेजु मेश्राम,रोहीत भोयर,जापान मडावी सर्व रा. परसटोला हे घटनास्थळावून पळून गेल्याने फिर्यादी पोना हेमंत मस्के यांचे रिपोर्टवरुन अपराध क्र. 222/2021 कलम 12 (अ) मजुका, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच दुसऱ्या कारवाहीमध्ये मस्कऱ्या चौक देवरी येथे काही इसम 52 तासपत्यावर पैशाचे हारजीतचा जुगार खेळत असल्याची माहीती मिळाल्याने पोलिसांनी धाड घातली असता 600 रु. नगदी, 52 तासपत्ते तसेच आरोपी अंगझडतीत 2200 रु नगदी, तिन मोबाईल कि. 9700/- रु. असा एकुण 12500 /- रु.चा मुद्देमाल मिळून आला.विनोद दिलीप सरोजकर वय 37,हितेश धनराज सोनवाने वय 28,महेश मनोहर नागदेवे वय 30, यांचेवर फिर्यादी पोहवा झिंगु मडावी यांचे रिपोर्टवरुन अपराध क्र. 222/2021 कलम 12 (अ) मजुका, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदर दोन्ही कारवाहीमध्ये 19950/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाही ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोहवा मडावी,गायधने,पोना करंजेकर,पोना मस्के,चौधरी,पोशी हातझाडे,डोहळे,शेंडे,नेवारे,धर्म,मेंटे यांनी केली.