ट्रकने शिक्षकाला चिरडले, जागीच मृत्यू

0
241

साकोली-दुचाकीने जाणार्‍या शिक्षकाला ट्रकने चिरडल्याने शिक्षकाचा ट्रकच्या चाकाखाली दबून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील तेली नाल्याजवळ घडली. या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बराच वेळपर्यंत विस्कळीत झाली होती.
प्रोफेसर शालिकराम बहेकार रा. साकोली असे मृत शिक्षकाचे नाव आहे. बुधवारी दुपारी ते मुंडीपार येथील शाळेतून साकोलीकरिता निघाले होते. परंतु सराटी जंगल परिसरात राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या गाडीच्या तोल गेल्याने ते ट्रकच्या चाकाखाली आले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
साकोली पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक जितेंद्र यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे. सदर रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
प्रोफेसर बहेकार हे अनेक वर्षांपासून मुंडीपार येथील खासगी शाळेत कार्यरत होते. त्यांना मागील महिन्यातच कायमस्वरुपी आदेश मिळाला होता. परंतु, अचानक त्यांच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.