Home गुन्हेवार्ता सरपंच महिलेच्या पतीची गुंडागर्दी

सरपंच महिलेच्या पतीची गुंडागर्दी

0

साकोली-सानगडीजवळील शिवणीबांध येथील महिला सरपंचाच्या पतीने त्याच ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी साकोली पोलिसांनी सरपंच पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
शिवणीबांध येथे वर्षभरापूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यामध्ये सरपंच पद अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव होता. त्यामुळे पुस्तकला सुधाकर उईके या महिला सरपंच म्हणून विराजमान झाल्या. शिवणीबांध ग्रामपंचायत येथे ९ सदस्य आहेत.
१६ एप्रिलला दुपारी १२ वाजताच्या सुमारास ग्रामपंचायतची मासिक बैठक सुरू झाली. त्यावेळी सर्व सदस्यांमध्ये ग्रामपंचायतच्या विकासकामावरून तसेच विविध मुद्यांवर वादविवाद झाला. त्यानंतर सर्व सदस्य आपापल्या घरी निघून गेले.
सरपंच पुस्तकला सुधाकर उईके यांचे पती सुधाकर हा सायंकाळी अनुसूचित जाती प्रवर्गातील एका ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या घरी गेला. त्यावेळी महिला सदस्य घरी नव्हत्या. तेव्हा सुधाकरने त्यांच्या आईला विचारणा करीत ईल भाषेत शिवीगाळ केली. महिला सदस्य घरी आल्यानंतर त्यांच्या आईने त्यांना घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर महिला सदस्य उपसरपंच यांच्या घरी माहिती देण्यासाठी गेल्या. तेवढय़ात पुन्हा सुधाकर उईके हा महिला सदस्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करायला लागला.
याप्रकरणी महिला सदस्यांच्या तक्र ारीवरुन साकोली पोलिस स्टेशनमध्ये आरोपी सुधाकर उईके याचेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पोलिस निरीक्षक बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नायक प्रमोद चेटूले तपास करीत आहेत.

मी घरी नसतांना सुधाकर उईके हा माझ्या घरी येऊन ईल भाषेत शिवीगाळ करून गेला. मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सरपंच पुस्तकला उईके यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्याव. आरोपीवर त्वरीत कारवाई करावी.
-महिला ग्रामपंचायत सदस्या, शिवणीबांध

error: Content is protected !!
Exit mobile version