चामडा कढलेला चितळचा मृतदेह आढळला

0
7

*लाखनी वनपरीक्षेत्रातील उमरझरी येथील घटना
भंडारा :- लाखनी वनपरीक्षेत्रातील उमरझरी सहवनक्षेत्रात चामडा कढलेला चितळचा मृतदेह आढळला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर असे की वनविभाग भंडारा अंतर्गत लाखनी वनपरिक्षेत्रातील , सहवनक्षेत्र – उमरझरी , नियतक्षेत्र – उमरझरी येथील मौजा – उमरझरी येथे दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी वन्यजीव विभाग एसटीपीएफ कर्मचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८.१० वाजता मौजा उमरझरी कक्ष क . १०१ ला लागुन क्षेत्र  शंकर तुकाराम पंधरे रा . उमरझरी यांचे शेतालगत नाल्यामध्ये वन्यप्राणी चितळ मृत अवस्थेत चमडा काढलेल्यासह आढळुन आला . व जागेवर साहीत्य पडलेले दिसले तेव्हा डॉग स्कॉड पथक साकोली यांचे मदतीने आरोपी राजकुमार शिवराम वाढई वय ४ ९ वर्षे रा . उमरझरी व रामकृष्ण सोमा सोनवाने वय ५२ वर्षे रा . उमरझरी पकडण्यात आले आहे. मौक्यावर आरोपींना जागेवर घेवुन जावुन मृत चितळ प्राण्याची चौकशी केली व आरोपींनी गुन्हा कबुल केला. आरोपीसह मौक्यावर वन्यप्राणी चितळ चा चमडा व ईतर साहीत्य जप्ती करून वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १ ९ ७२ अंतर्गत वन्यजीव अपराधाची नोंद करण्यात आली आहे . अधिक चौकशी अंती वरिल आरोपींना आज दिनांक दि .०२ मे २०२२ रोजी न्यायदंडाधिकारी ( प्रथम श्रेणी ) साकोली यांच्या समक्ष हजर केले असता त्यांना न्यायालयाने १२ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असुन त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृह भंडारा येथे करण्यात आली .
सदर प्रकरणाचा तपास राहुल गवई उपवनसंरक्षक , भंडारा वनविभाग भंडारा तसेच आर . पी . राठोड सहाय्यक वनसंरक्षक साकोली यांचे मार्गदर्शनाखाली एस . पी . गोखले वनपरिक्षेत्र अधिकारी लाखनी हे करीत असुन सदर कार्यवाही दरम्यान वाय . एस . तांडेकर क्षेत्र सहा . उमरझरी तसेच आर . डी . कोदाने बिटरक्षक उमरझरी तसेच एन.बी. उशीर बिटरक्षक चांदोरी, आर . बी . पडोळे बिटक सोनेगाव हे उ