मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार घेतलेल्या शिक्षणाधिका-याला पाेलिसांनी केली अटक

0
42

सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहारच्या कोल्हापुरातील घराची पाच तास झाडाझडती

 सोलापूर-उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील एका स्वयंअर्थसहाय खासगी शाळेचे आठवी ते दहावीचे वर्ग ‘यु-डायस प्लस’मध्ये समाविष्ट करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी ५० हजारांची लाच मागितली.त्यातील २५ हजार रुपये सोमवारी दि.३१ ऑक्टोबर रोजी कार्यालयातच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाेहारला रंगेहाथ पकडले.

लाेहार यास महाबळेश्वरातील एका संस्थेने नुकताच राज्यस्तरीय पुरस्कार दिला होता. हा पुरस्कार उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत रविवारी दि.३० ऑक्टोबर त्य़ाने स्विकारला हाेता. अन् दुस-याच दिवशी त्याला २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना एसीबीने पकडलं.

तत्पूर्वी, झेडपीच्या प्राथमिक शाळांची स्थिती सुधारण्याच्या बाता मारत शिक्षकांना उपदेशाचे धडे देण्यामुळे लोहार चर्चेत होते. ग्लोबल टिचर डिसले गुरुजींच्या प्रकरणात बेधडक वक्तव्यांमुळे पण ते चर्चेत राहिले हाेते.दरम्यान लाेहारने २५ हजार रुपये सोमवारी दि.३१ ऑक्टोबर रोजी कार्यालयातच स्विकारल्याने त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

सोमवारी दि.३१ ऑक्टोबर रोजी रात्री सुरू दहापासून सुरू झालेली तपासणी मंगळवारी दि.१ नोव्हेंबर पहाटे तीनपर्यंत सुरू होती. या तपासणीमध्ये कागदपत्रे, बॅंकांचे पासबुक आणि इतर कागदपत्रे पाहण्यात आली.लोहार यांच्या स्थावर मालमत्तेचा सर्व कागदपत्रांचा अहवाल कोल्हापूर एसीबी सोलापूर एसीबीकडे सुपूर्त करणार आहे.किरण लोहार यांनी रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापुरात शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. या तीनही ठिकाणी ते वाद्‌ग्रस्त राहिले आहेत. सोलापुरात पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. लोहार हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. कोल्हापूरमधील शिक्षक कॉलनीमध्ये त्यांचे घर आहे. त्या घराची कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपासणी केली.