जनावरांची अवैध वाहतूक करणार्‍या ट्रकवर आमगाव पोलिसांची कारवाई

0
20

आमगाव-जनावरांची अवैध वाहतूक करून कत्तलखान्याकडे घेऊन जानारा भरलेला ट्रक आमगाव पोलिसांनी पकडल्याची घटना दि. 0१ नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. आमगाव तालुक्यातील पोलिस ठाण्याचे कर्मचारी रात्रीला पोलिस गस्तीदरम्यान, गुप्त माहीतीच्या आधारावर आमगाव – सालेकसा मार्गावर नाकाबंदी करीत असताना, ट्रक क्र. एम. एच.४0 / सी. डी. ९४७२ हा ट्रक आमगाव मार्गे सालेकसाकडे जातानीं आढळून आला. पोलिसांनी थांबवण्याच्या प्रयत्न केला. तसा चालकाने ट्रक थांबवताच ट्रक चालकास विचारपूस केली असता अवैध पद्धतीने जनावरांची तस्करी होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात येताच टक, ट्रकचालक व आणखी चार आरोपींना ताब्यात घेतला.
ट्रकची पाहणी केली असता, या ट्रकमध्ये कत्तलखान्याकडे नेण्यात येत असलेल्या २२ पांढर्‍या रंगाचे बैल व एक बोदा अशा तेविस जनावरांची सुटका करीत सालेकसा तालुक्यातील धानोली येथील गौशालेत ठेवन्यात आले आहे. या २३ जनावरांची किंमत ४.२0 लाख रुपये सांगन्यात आली असुन त्या वाहनाची किमंत १0 लाख असा ऐकुन १४ लाख २0 हजार रुपयांचा माल आमगाव पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.