मार्निग वाॅकला जाणार्या शाळकरी विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

0
57

गोरेगाव,दि.19ः- गोरेगाव पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या गोरेगाव-ठाणा मार्गावर बोटे येथे सकाळी 6 वाजेच्या सुमारास फिरायला(मार्निग वाँक)गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याला ट्रकने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 19 डिसेंबरला घडली.मृत विद्यार्थ्याचे नाव नमरिश रंजित ठाकूर(रा.बोटे) असे असून तो सोनी येथील एमआय पटेल हायस्कुलचा 10 व्या वर्गाचा विद्यार्थी होता. घटनेची माहिती होताच बोटे येथील नागरिकांनी ट्रकला अडवून रास्तारोको आंदोलन केले.घटनेची माहिती होताच जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले,माजी जिल्हा परिषद सभापती पी.जी.कटरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते रविकांत बोपचे यांनी घटनास्थळाव धाव घेतली.गोरेगावचे पोलीस निरिक्षक सचिन म्हेत्रे यांनीही घटनास्थळी धाव घेत आंदोलकाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.