गंगाबाई स्त्री रूग्णालयात मोबाईल चोराला दिला चोप

0
26

गोंदिया,दि.23ः- येथील गंगाबाई महिला रूग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेला हुलकावणी देत 21 जानेवारीच्या रात्रीला एका चोरट्यांने उपचाराकरिता दाखल रूग्णांचा नातेवाईकांचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय येथे मोबाइल चोरी करत असलेल्या एका चोराला लोकांनी रंगेहात पकडला व त्याचा चांगलाच चोप दिला. असून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.जिल्हयातील एकमात्र गंगाबाई स्त्री रूग्णालय असून या ठिकाणी संपूर्ण जिल्हयातील महिलांची प्रसुती मोठया प्रमाणात होतात. यामुळे रूग्णांचे नातेवाईक ही रूग्णांसोबत आल्यावर त्यांना थांबण्यासाठी जागा नसल्याने रूग्णालयातील आवारातील मोकळया ठिकाणी जिथे जागा मिळेल तिथे थांबत असतात. अश्याच लोकांचा येथील सातत्याने वावरणारे असामाजिक तत्व चोरटे याचा फायदा घेत त्यांचा मोबाईल व इतर दागदागिने वस्तुंची चोरी करतात. या ठिकाणी अनेकदा मोबाईल चोरीच्या घटना घडल्या असून मोटारसायकल देखील चोरी झाल्याची घटना समोर आल्या आहेत.21 जानेवारीच्या रात्री सुमारास एका रूग्णाच्या नातेवाईकाचा १७ हजारांचा मोबाईल चोरी गेल्याची घटना देखील घडली. या ठिकाणी पोलिस चौकी आहे. मात्र ते देखाव्यासाठी असल्याचे रूग्णाचे नातेवाईक बोलून दाखवितात. या ठिकाणी चोरीच्या घटना मोठया प्रमाणात वाढल्या असून पोलिसांनी तसेच रूग्णालय प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी रूग्णांचे नातेवाईक यांनी केली आहे.