Home गुन्हेवार्ता आॅनलाइन जुगार अड्ड्यावर धाड: 3 लाख 24 हजारांचा माल जप्त

आॅनलाइन जुगार अड्ड्यावर धाड: 3 लाख 24 हजारांचा माल जप्त

0

गोंदिया : रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाºया आॅफीसर कॉलनी, कुडवा गोंदिया येथे एका बंद घरात आॅनलाइन जुगार खेळणाºया चौघांवर रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 3 लाख 24 हजार 300 रुपयांचा माल जप्प्त करण्यात आला आहे. ही कारवाई 31 जानेवारीच्या रात्री 11.30 वाजता करण्यात आली.
आॅफीसर कॉलनी, कुडवा येथील नितीश डोंगरे यांच्या घरी आॅनलाइन जुगार सुरू असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. त्या आधारे रामनगर पोलिसांनी धाड टाकून आरोपी भूपेंद्र श्यामराव बोरकर (वय 24, रा. दंतेश्वरी पारा वॉर्ड, छत्तीसगड), अभिनव अशोककुमार चंद्रकार (वय 21, रा. आझाद वॉर्ड, क्र.1, गोलबाजार, डोंगरगड, जि. राजनांदगाव, छत्तीसगड), लोकेश जगदीश खोब्रागडे (वय 31, रा.वॉर्ड, क्र.3 कुडवा गोंदिया), शुभम रवींद्र नंदेश्वर (वय 22, रा.एम.आय.टी. कॉलेजच्या बाजूला वॉर्ड, क्र.2, कुडवा, गोंदिया) व नितीश तेजराम डोंगरे (वय 32, रा. बोथली, ता. आमगाव, जि. गोंदिया) यांच्याविरूद्ध महाराष्टÑ जुगारबंदी कायदा कलम 4, 5 म.जु. का. सहकलम 109 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संदेश केंजळे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार सुनीलसिंह चव्हाण, राजेश भुरे, जावेद पठाण, अभय चव्हाण, पोलीस शिपाई कपिल नागपुरे, राहुल वनवे यांनी केली.

error: Content is protected !!
Exit mobile version