Home गुन्हेवार्ता धान घोट्याळय़ाप्रकरणी चौघांना अटक

धान घोट्याळय़ाप्रकरणी चौघांना अटक

0

धानोरा-तालुक्यातील मुरूमगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत खरीप हंगाम २0२0-२१ मध्ये ३ कोटींचा धान घोटाळा उघडकिस आला. या घोटाळ्याबाबत प्रादेशिक कार्यालयाने मुरूमगाव येथील पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. या प्रकरणातील यापूर्वी दोन आरपींना अटक केल्यानंतर १ फेब्रुवारी रोजी तिघांना व २ फेब्रुवारी रोजी १ एकास अशा चार जणांना अटक केली आहे. अकेतील आरोपींची संख्या आता ७ वर पोहेचली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये प्रेमानंद बाजीराव गुंडरे रा. मालेवाडा, रवी श्यामराव बोरसरे रा. मालेवाडा, राजकुमार बाबुराव फरांडे रा. इरूपटोला, जाकीर कुरेशी रा. मुरूमगाव यांचा समावेश आहे.
उपप्रादेशिक कार्यालय धानोरा अंतर्गत आदिवासी विकास कार्यकारी संस्था खरेदी केंद्र मुरूमगाव येथे आधारभूत खरेदी योजना हंगाम २0२१-२२ मध्ये खरीप पणन हंगमातील अंदाजे ९८७८.९५ क्विंटल धान्य गोडावूनला शिल्लक नसल्याने संस्थेचे व्यवस्थापक एल.जी. धारणे, उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज चौधरी, प्रतवारी कार तथा प्रभारी विपणन निरीक्षक राहुल कोकडे यांना सबंधित विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, समाधानकारक खुलासा न दिल्याने उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज चौधरी आणि विप्पपन निरीक्षक राहुल कोकोडे यांना निलंबित करण्यात आले होते.
त्यानंतर तपासणी अधिकारी बावणे उपप्रादेशिक कुरखेडा यांनी १८ ऑगस्ट २0२२ ला मुरुमगाव येथील पोलिसात तक्रार दाखल केली. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ वाजवून दिलेल्या ३ कोटी २ लाख अपरातफर प्रकरणात मुरूमगाव येथील पोलिस मदत केंद्रात व्यवस्थापक एल. जी. धारणे, केंद्रप्रमुख गुरुदेव धारणे, शंकर कुमरे, राहुल कोकडे, संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि अज्ञात व्यापारी यांच्या विरोधात ३१ ऑगस्ट २0२२ ला ४२0, ४0६, ४0९, ३४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मुरूमगाव येथील पोलीस मदत केंद्रात आरोपी विरोधात गुन्ह्याची नोंद करून दोन आरोपिला अटक केली होती. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी तिघांना व २ फेब्रुवारीला एकास अशा चार जणांना अटक करण्यात आली.

Exit mobile version