भटकलेल्या मनोरुग्ण तरुणीस पालकांचे स्वाधीन

0
26

गोंदिया-शहरातील डब्लींग ग्राऊंड परिसरात भरकटलेल्या मनोरुग्ण 22 वर्षीय तरुणीला पोलिस विभागाच्या दामिनी पथकाने तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात महिला, बालके व शाळकरी मुली, युवतींच्या सुरक्षितता संबंधात कारवाई करण्याचे कार्य दामिनी पथकाव्दारे सुरू आहे.यातंर्गतर्ग 10 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास 22 वर्षीय तरुणी भरकटलेल्या स्थितीत दामिनी पथकाला आढळले.पथकाने तिची विचारपूस केली असता ती मनोरुग्ण असून भरकटली असल्याचे दिसून आहे. दरम्यान गोरेगाव तालुक्यातील सिलेगाव येथील असल्याचे निदर्शनास आले.दरम्यान सिलेगावच्या पोलिस पाटलाकडून संबंधित युवतीबद्दल शहानिशा झाल्यावर तिला तिच्या कुटूंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कामगिरी दामिनी पथक प्रमुख पोउपनि प्रियंका पवार यांच्या नेतृत्तृवात पोशि अंबादे,बावनकर, पाचे यांनी केली.