दहावीच्या विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू

0
34

पवनी -तालुक्यातील वलनी (चौ) येथील गांधी विद्यालयात इयत्ता १० वीला शिकत असलेला श्रेयस युवराज जिभकाटे (१६) रा. वलनी (चौ) मित्रांसोबत वैनगंगा नदीवर आंघोळ करण्यासाठी गेला असता खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी सुट्या असतात. त्यामुळे श्रेयस घरी अभ्यास करीत बसलेला होता.आई-वडील शेतावर कामासाठी गेलेले असताना त्याचे मित्र त्याला सोबत घेऊन नदीवर गेले. सुरुवातीला श्रेयस पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरला. तो पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच मदतीला एक एक करून दोन्ही मित्र धावले पण त्यांना श्रेयसला बाहेर काढण्यात यश आले नाही. आरडाओरड करून त्यांनी ११८ क्रमांकावर फोन केला व पोलीस कक्षात कळवले. काही वेळात शव शोधण्यात ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांना यश आले.