३२ गो वंशांची सुटका !गोवंश मालकासह दोघांवर गुन्हा दाखल

0
30

गोेंदिया ,दि.03- सालेकसा तालुक्यातील रोंढा गावाजवळील गणपतटोला जंगलात बंदिस्त ठेवलेल्या 32 जनावरांची सालेकसा पोलिसांनी सुटका केली.ही कारवाई 2 मार्च रोजी पहाटे 4 वाजता करण्यात आली.या प्रकरणी जनावर मालकांसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांना गणपतटोला जंगलात कत्तलखान्याकडे घेऊन जाण्यासाठी जनावरे बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे ठाणेदार बाबासाहेब बोरसे व त्यांच्या पथकाने धाड टाकून 1 लाख 92 हजार किमतीच्या 32 गोवंशाची सुटका केली.याप्रकरणी रामेश्वर ब्रिजलाल बिसेन (45 रा .नाका निंबा),गणेश मानीकलाल लाडे (32, रा.बडा निंबा) व जनावरे मालक- फुलेरा.टिमकीटोला(मप्र) यांच्यावर सालेकसा पोलिसात कलम 5(अ),(2),5(ब ),6 महा.प्रा.संर.का.सहकलम 11 (च),(ज), (झ), प्रा.नि.वा.प्र.का.1960 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.ही कारवाई ठाणेदार बाबासाहेब बोरसे,पो उपनि गणेश शिंदे,पो.अंमलदार अजय इंगळे,दिनेश गौतम,रितेश अग्निहोत्री यांनी केली.