Home गुन्हेवार्ता सरपंच, उपसरपंच लाच स्वीकारताना लाच लुचपतच्या जाळ्यात,कणकवलीत वनमजूर

सरपंच, उपसरपंच लाच स्वीकारताना लाच लुचपतच्या जाळ्यात,कणकवलीत वनमजूर

0

रत्नागिरी :-लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी संगमेश्वर येथे यशस्वी सापळा कारवाई केली आहे.यामध्ये प्रशांत प्रदिप शिर्के, सरपंच, ग्रामपंचायत राजीवली.ता. संगमेश्वर आणि सचिन रमेश पाटोळे, उप सरपंच, ग्रामपंचायत राजीवली. या दोघांना 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आले आहे.

यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांचे मित्राचे वतीने सदर ग्रामपंचायत चे अखत्यारीतील पाखाडी तयार करणेचे चे काम त्यांनी केले होते. तक्रारदार यांनी यापूर्वी केलेल्या कामांचे बिल मंजूर करण्याचा मोबदला व सध्या पूर्ण झालेल्या कामाचे बिल मंजूर करण्याचा मोबदला म्हणून इतर लोकसेवक प्रशांत शिर्के, सरपंच, ग्रामपंचायत राजीवली व इतर लोकसेवक सचिन पाटोळे, उपसरपंच ग्रामपंचायत राजीवली, तालुका संगमेश्वर यांनी तक्रारदार यांचेकडे 40,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 30,000/- रुपये लाचेची मागणी करून मागणी केलेली लाच रक्कमेपैकी 15000/- रू. सरपंच प्रशांत शिर्के यांनी व 15000/- रू. उपसरपंच सचिन पाटोळे यांनी आज रोजी स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले असून इतर लोकसेवक क्र. 1 व 2 यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

कणकवली वनविभाग कार्यालयातील वनमजूर लाच प्रकरणी अटकेत…

कणकवली :-लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालयात धाड आज सायंकाळी ५.३० वाजाता टाकली आहे.तक्रारदार यांनी नागवे येथील लाकूड तोड आणि वाहतूक पास कामाकरीता साहेबांच्या मागणीनुसार ४० हजारांची मागणी वनमजूर नारायण भास्कर शिर्के (वय ५०, कळसुली) यांनी केली.त्यात ३५ हजार रुपयांची रक्कम देण्याचे तक्रारदार यांनी मान्य केले.गेल्या ८ दिवसांत याबाबत मागणी केल्याचे व्हॉईस रेकॉर्ड मिळाले होते. त्यावरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग यांनी कारवाई केली आहे.

तक्रारदार यांच्याकडे तोड काम व लाकूड वाहतूक करण्यातही पैसे मागितले,गेल्या ११ एप्रिल २०२३ रोजी तक्रारदार यांनी अर्ज केला होता.संशयित श्री.शिर्के यांनी ३५ हजार रुपयांचे देण्याचे निश्चित झाले.गेल्या ८ ते १० दिवसांपासून ही चर्चा चालू होती.तक्रारदार यानी गेले दहा दिवस रेकॉर्ड केले,पैसे स्वीकारण्यास आरोपी टाळाटाळ करत होता,बाहेर भेटू असे सांगत होते.अखेर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग यांनी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेतली. त्यानुसार परवानगी येताच एसीबीने कारवाई केली.

संशयित आरोपीला बातमी समजली होती,त्यामुळे सावध झाला होता.पैसे मागितले खरे मात्र दानिक दिलात नाही मग झालं,असे म्हणत होता.त्यामुळे अचानक कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालयात ही कारवाई आज सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आली.या आरोपीला ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.वैद्यकीय तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांनी तत्कालीन कणकवली तहसीलदार संजय पावसकर यांनाही लाज घेतल्याप्रकरणी पकडून दिले होते.ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील,पोलीस अधिकारी आस्मा मुल्ला,जनार्दन रेवंडकर,निलेश परब,रविकांत पालकर ,जितेंद्र पेडणेकर,हवालदार अजित खंडे ,प्रथमेश पोतनीस,कांचन प्रभू आदी पथकाने कारवाई केली.

error: Content is protected !!
Exit mobile version