Home गुन्हेवार्ता मंदिरात चोरी करणार्या आरोपींला काही तासातच पोलिसांनी केले गजाआ़ड

मंदिरात चोरी करणार्या आरोपींला काही तासातच पोलिसांनी केले गजाआ़ड

0

गोंदिया,दि.16ः-येथील शहर पोलीस ठाणे अंतर्गतच्या मंदिराच्या दाराचे टाळे तोडून मंदिरातील मूर्ती वरील चांदीचे छत,, दानपेटी मधील रकमेची चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात अटक करुन मंदिर चोरीचे तिन्ही गुन्हे उघडकीस आणले आहे.

सविस्तर असे की,14 मे 2023 रोजीच रात्रो 21.00 वा ते 06.00 वा दरम्यान मालवीय शाळेच्या समोरील  हनुमान मंदीराच्या समोरील दाराचा ताला तोडुन हनुमानजीच्या डोक्यावरील चांदीचे छत, व दानपेटीतील रक्कम, तसेच चंद्रशेखर वार्ड, श्रीनगर बब्बा भवन जवळील शितला माता मंदीराचे समोरील दाराचा ताला तोडुन दानपेटीतील पैसे/ रक्कम आणि मळी चौकाचे मागील मॉ दुर्गेश्वरी मंदीराचे गेटचा ताला तोडुन मंदीरातील दानपेटी मधील पैसे/रक्कम अज्ञात चोरट्यानी चोरी करून तिन्ही मंदिरातील दानपेटीतील अंदाजे नगदी रक्कम 8,500/- रुपये, एक चांदीचा छत किमती 7000/- रूपये असा एकूण 15,500/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती.या घटनेची तक्रार पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक 1)299/2023 कलम 457, 380 भादंवि 2)300/ 2023 कलम 457, 380 भादंवि 3)302/2023 कलम 457, 380 नुसार तीन वेगवेगळं गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यानुसार पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने यांनी गुन्हेगारांचा छडा लावून तात्काळ गुन्हेगारांना अटक करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सूचना गोंदिया शहर पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांना तसेच स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी दिनेश लबडे यांना देण्यात आले.त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशान्वये तिन्ही गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोधाकरीता वेगवेगळी पथके नेमण्यात आली होती.

या अनुषंगाने स्थागु.शा.चे पोलीस पथक गुन्हेगारांचा शोध करीत असताना पथकास विश्वस नीय गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली की नामे राहुल ऊर्फ चोचो ओंकार कर यांनी दिनांक- 14+15/05/2023 रोजीचे रात्रो दरम्यान मंदिराचे दाराचे टाळे तोडून मंदिरातील दानपेटी मधील रकमेची तसेच चांदीच्या छताची चोरी केली असून नागपूरला पळून गेल्याची माहिती मिळाली.त्या माहितीच्या आधारे राहुल उर्फ चोचो गेंदलाल ओंकारकर (वय 24,रा.नंगपुरा मुर्री) यास सापळा रचून भंडारा येथून ताब्यात घेण्यात आले. ताब्यांत घेण्यात आलेल्या संशयितास पो. ठाणे गोंदिया शहर परिसरातील हनुमान मंदीर,शीतला माता मंदिर व दुर्गेश्वरी मंदिर येथे झालेल्या चोरी संबंधाने विचारपूस केली असता संशयित आरोपीने स्वतः तिन्ही मंदिरातील दानपेटी मधील पैसे/ रक्कम व चांदीचे छत चोरी केल्याचे कबूल केले. गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता नागपूरला पैसे खर्च केल्याचे सांगून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमालपैकी 2900/- रुपयांचा मुद्देमाल आरोपी कडून जप्त करण्यात आले आहे.

आरोपीस पुढील कायदेशीर कारवाई करीता गोंदिया शहर पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. नमूद गुन्ह्यांचा तपास माननीय वरिष्ठांच्या निर्देशांप्रमाणे व मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलीस करीत आहेत.सदरची उल्लेखनिय कामगिरी स्था.गु.शा. चे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांच्या मार्गदर्शनात सहा.फौज.अर्जुन कावळे, पोहवा-राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, नेवाला ल भेलावे, लक्ष्मण बंजार तसेच तांत्रिक शाखेचे सपोनि श्री. शिद, यांचे मार्गदर्शनात पो. हवा दिक्षित दमाहे, प्रभाकर पलांदुरकर, धनंजय शेंडे, संजू मारवाडे, मोहन शेंडे, यांनी उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे.वरिष्ठांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version