अवैध दारू वाहतुक प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून सिंधुदुर्गात मोठी कारवाई

0
9

तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून बांदा – वाफोली रस्त्यावर डोंगरीकर हॉटेलजवळ पिकअप वाहनासह 17 लाख 49 हजार 220 रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

गोवा बनावटीच्या दारू वाहतूक प्रकरणी नाशिक येथील 1 जण ताब्यात..

बांदा:-रिकाम्या प्लास्टिकचे कॅरेट आणि नारळाच्या शहाळयाच्या आडून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात बोलेरो गाडीसह एकूण 17 लाख 49 हजार 220 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून बांदा – वाफोली रस्त्यावर डोंगरीकर हॉटेलजवळ करण्यात आली.अंबादास पोपट अहिरे (रा. दहीवड, ता.देवळा,नाशिक) असे संशयिताचे नाव आहे.दि. 26 ऑगस्ट 2023 रोजी  विजय सूर्यवंशी,आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य.सुनील चव्हाण संचालक (अं.व.द) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई,.विजय चिंचाळकर,विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग कोल्हापूर, वैभव वैद्य प्र अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीनुसार बांदा – वाफोली रोड,डोंगरीकर हॉटेलजवळ वाफोली ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग येथे महिंद्रा कंपनीचे सफेद रंगाचे बोलेरो पिकअप चारचाकी वाहन क्र.MH – 48 -CB -3259 सदर वाहनाची तपासणी केली असता, सदर वाहनांमध्ये रिकामे प्लॅस्टिकचे कॅरेट व खराब नारळाचे शहाळयांखाली गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 150 बाॅक्स व बिअरचे 8 बाॅक्स अवैध साठा मिळून आला.आरोपी अंबादास पोपट आहिरे उर्फ अंबादासभाई पोपटभाई आहिरे वय 40 वर्षे राहणार 687, दहीवड ता.देवळा जि.नाशिक – 423102 यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर गुन्ह्यांमध्ये अं.रुपये ८ लाख 64 हजार किमतीचे मद्य व अं.रुपये 30 हजार 720 किंमतीची बियर तसेच रुपये 8 लाख 50 हजार किंमतीचे चारचाकी वाहन व मद्य बिअर साठा लपवण्यासाठी वापरलेले रुपये 4 हजार 500 रुपये किमतीची 30 प्लॅस्टिकची रिकामे कॅरेट तसेच 700 खराब नारळाचे शहाळे असा एकूण माल अं. रुपये 17 लाख 49 हजार 220 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई  वैभव वैद्य प्र.अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली .संजय मोहिते, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली, अमित पाडळकर,निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कुडाळ,.तानाजी पाटील,.प्रदीप रास्कर दुय्यम निरीक्षक .गोपाळ राणे,स.दू.नि.श्री.प्रसाद माळी जवान,व .रणजीत शिंदे जवान नि.वाहन चालक यांनी ही कारवाई केली.सदर प्रकरणी पुढील तपास निरीक्षक तपासणी नाका इन्सुली श्री.संजय मोहिते हे करित आहेत.