गोंदिया, 2 सप्टेंबर : गोंदिया रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या हॉटेल हार्मोनी या हॉटेलमध्ये गोंदिया शहरातील एका युवकाने आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सकाळी जेव्हा हॉटेलच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी आवाज दिला तर कोणताही प्रतिसाद त्यांच्याकडून आला नाही. त्यामुळे डुप्लिकेट चावीने रूम उघडण्यात आली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. या तरुणाने आत्महत्या का केली? याबद्दल अद्याप माहिती समोर आली नाही. शहरातील माताटोली येथे राहणारा 20 वर्षीय क्रिश विजय मानापुरे हा तरुण काल (1 सप्टेंबर) दुपारी हॉटेल हार्मनी या ठिकाणी थांबण्यासाठी आला. आपलं आधार कार्ड वगैरे घेऊन त्याने 103 नंबरची रूम बुक केले. त्या रूममध्ये शिफ्ट झाला. त्यानंतर आज सकाळी जेव्हा हॉटेलच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी आवाज दिला तर रुममधून कोणताही प्रतिसाद त्यांच्या कडून आला नाही. त्यामुळे डुप्लिकेट चावीने रूम उघडण्यात आली. तर क्रिश याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. याविषयी गोंदिया शहर पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांनी क्रिशने आत्महत्या का केली? आणि गोंदियातला तरुण शहरातील हॉटेलमध्ये का राहायला गेला? या विषयी आता गोंदिया शहर पोलीस तपास करीत आहे.