गणेशपेठ बस स्थानकातील बसमध्ये आढळला बॉम्ब

0
13

नागपूर : शहरातील मध्यवर्ती गणेशपेठ बस स्थानकातील अहेरी आगाराच्या बसमध्ये बुधवारी दुपारी १ च्या सुमारास “टिफिन बॉम्ब” आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही बस तीन दिवसांपासून याच आगारात उभी होती. काल ती सावनेरला जाऊन आल्याची माहिती आहे. ही माहिती कळताच गणेशपेठ पोलिसांचा ताफा आणि बीसीडीएसची टीम घटनास्थळी दाखल झाली.याशिवाय दहशतवादी विरोधी पथकही दाखल झाले तसेच बीडीडीएसची टीम घटनास्थळी दाखल झाली. बॉम्ब सदृश्य टिफीन नष्ट करण्यासाठी सुराबर्डी येथे नेण्यात आला आहे. बॉम्ब सापडल्याची माहिती बाहेर येताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला.