Home गुन्हेवार्ता अवैध रेती तस्करी, 3 ट्रॅक्टरांसह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध रेती तस्करी, 3 ट्रॅक्टरांसह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

गोंदिया : अवैध गौण खनिज रेती चोरी करणाऱ्या चार जणांना अटक करून तीन ट्रॅक्टरसह 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने 27 आणि 28 मार्च रोजी केली.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात 27 व 28 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेने तिरोडा तालुक्यातील टंकीटोली री येथे गौणखनिजाची तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाई केली. त्यांच्याकडून रेतीची चोरी करून वाहतूक करताना 4 जणांविरोधात दवनीवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून 3 ट्रॉलीसह ट्रॅक्टर आणि रेती असा एकूण 14 लाख 9 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ओमप्रकाश रामचंद्र देशमुख (वय 35), सुजान अर्जुन कुसवाहा (वय 28), राजेश पतीराम बावणकर (वय 50) तसेच तिरोडा पोलिस ठाण्यात प्रमोद गोपीचंद ठवकर (वय 44, रा. मुंढरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version