आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीचा अपघात;६ जागीच ठार

0
12

अकोला :- अकोला जिल्ह्यातील पातूर घाटातील नवीन बायपास वरील नानासाहेब मंदिर समोर दोन कारचे
अमोरसमोर धडक झाल्याने या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला.मृतकांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.अपघातातील आमदार सरनाईकचे कुटुंब हे वाशीमला (Washim)जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.सदरचा अपघात हा महामार्ग वरील चारपदरी असलेल्या अकोला वाशिम मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे, त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक एकाच रस्त्यावर वळविण्यात आली होती, त्यामुळेच हे दोन्ही वाहन एकाच रस्त्यावर आल्याने यांचा अपघात समोरासमोर झाल्याचे वृत्तआहे. या अपघातात मृतकांमध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या पुतणी व पुतण्याचा समावेश आहे.या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये तीन जण गंभीर जखमी आहेत. मृतकांमध्ये रघुवीर अरुण सरनाईक वय 28, अस्मिता अजिंक्य आमले वय नऊ महिने, शिवानी अजिंक्य आमले वय 30 वर्ष, सिद्धार्थ यशवंत इंगळे वय 35 वर्ष राहणार पास्टुल, शंकर ठाकरे राहणार पास्टुल व सुमेध इंगळे यांचा समावेश आहे.तर जखमींमध्ये (injured) पियुष देशमुख वय 11 वर्ष, सपना देशमुख वय 41 वर्ष तर श्रेयस सिद्धार्थ इंगळे वय तीन हे गंभीर ते जखमी आहेत.नेमका हा अपघात कशामुळे झाला याचा तपास पातुर पोलीस करीत आहे.