पॉस्को प्रकरणात आरोपीला 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

0
16
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.११ः– अतिरिक्त व सत्र न्यायालयाचे मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी अत्याचार व पॉस्को प्रकरणातील निकाल देताना आरोपीला 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.किशोर रामू शेंडे (रा.मोखे किन्ही, जि.भंडारा) असे आरोपीचे नाव आहे.

गोरेगाव येथील एक कुटूंब तिरोडा तालुक्यातील सर्रा येथे नातेवाईकाच्या लग्न समारंभात सहभागी झाले होते. विवाह सोहळा आटोपल्यानंतर 23 एप्रिल 2019 रोजी रात्रीच्या सुमारास आरोपीने मुलीला जवळील शेतात नेऊन अत्याचार करुन पळ काढला. याप्रकरणी मुलीच्या कुटूंबीयांनी तिरोडा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाचक्र फिरवून आरोपी किशोर शेंडेला अटक केली व तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावनी दरम्यान किशोर शेंडेवर गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी आरोपीला भादंवि 363 नुसार 2 वर्ष कारावास, 1 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिने अधिक करावास, भादंवि 354 नुकसान 3 वर्ष कारावास, 2 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिने अधिक कारावास तसेच भादंवि 376 (A-इ) नुसार कारावास, 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिने अधिक करावास अशी शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील कृष्णा पारधी यांनी बाजू मांडली. पैरवी कर्मचारी म्हणून पोलिस हवालदार मोहन भोयर यांनी काम पाहिले.