केळझर येथे ट्रॅव्हल्स व बसला अपघात,२० प्रवासी जखमी

0
21

वर्धा,दि.२२- जिल्ह्यातील केळझर येथील शहीद चौकात आज २२ मे रोजी सकाळी झालेल्या ट्रव्हल्स व राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या अपघातात २० प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सेलू येथील बृहस्पती मंदिरातून आजनसरा येथे जात असलेल्या ट्रॅव्हल्सने वर्धा येथून नागपूरकडे निघालेल्या बसला धडक दिली.ट्रॅव्हल्समधील सर्व  प्रवासी हे टाकळघाट येथील असल्याची माहिती असून ट्रॅव्हल्स मधील 16 प्रवासी जखमी तर बसमधील चालकासह 4 प्रवासी जखमी झाले आहेत.जखमी मध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे.जखमीना सेलू, सेवाग्राम येथील रुग्णालयात करण्यात आले दाखल असून सेलू पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.