दारू सोडण्याचे औषध घेतल्याने दोघांचा मृत्यू; दोघे गंभीर

0
44

चंद्रपूर :- भद्रावती तालुक्यातील गुळगाव येथील काही युवकांनी दारू (alcohol)सोडण्याची औषध घेतल्याने यातील दोघांची अचानक तब्येत बिघडून त्यांचा मृत्यू झाला.  तर दोघे गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.हयोग सदाशिव जीवतोडे व 19 वर्ष व प्रतीक घनश्याम दडमल वय 26 वर्ष राहणार गुळगाव अशी मृतकांची नावे असून सदाशिव पुंजाराम जीवतोडे वय 45 वर्ष व सोमेश्वर उद्धव वाकडे वय 35 वर्षे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार(Treatment) सुरू आहे. सदर चारही व्यक्ती दिनांक 21 मे रोजी गुळगाव येथील काही जण गाडी करून वर्धा (Wardha)जिल्ह्यातील शेडेगाव येथे दारू सोडण्याचे औषध घेण्यासाठी गेले होते. तिथे एका शेळके, वैद्याकडून दारू सोडण्याचे औषध घेऊन दुपारी आपल्या गावी परत आले. त्यानंतर या चौघांची ही अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना भद्रावती येथे उपचारा साठी आणत असतांना यात दोघांचा वाटेतच मृत्यू झाला तर दोघांवर उपचार सुरू आहे. सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. याप्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.