26 जनावरांसह वाहन ताब्यात, चालक फरार, 21.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
26

गोंदिया : देवरी तालुक्यातील मुरदोली गावाजवळील महामार्गावर 26 बैल कोंबून भरलेला ट्रक देवरी पोलिसांनी आज मंगळवारी पहाटे 3.30 वाजता दरम्यान पाठलाग करून ताब्यात घेतला आहे. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत एकाच आठवड्यांतील ही दुसरी मोठी कारवाई आहे. AP 29 V9219 क्रमांकाचा ट्रक चिचगड मार्गे देवरी वरुन सुसाट वेगाने नागपुरकडे जाताना गस्तीवर असलेले पोलिस निरीक्षक प्रविन डांगे यांना दिसला. थांबण्याचा इशारा केल्यानंतरही तो भरधाव निघाला. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. ताडपत्री झाकून असलेला ह्या ट्रकला देवरी तालुक्यातील महामार्गावरील मुरदोली गावाजवळ शेवटी पोलिसांनी ताब्यात घेतला तोपर्यंत चालक पसार झाला होता. ट्रकसह 26 जनावरे असा 21 लक्ष 20 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी विविध कलमान्वये देवरी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास सुरूवात केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रविन डांगे यांच्या सह पोलिस चालक पंकज पारधी, पोलिस नायक नागेश बोपचे, इंन्द्रवार पंधरे, अनिल ऊके यांनी पार पाडली आहे.