दोन जहाल माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

0
123
श्व् दोघांपैकी एकाचा गेल्या 30 वर्षापासुन माओवादी संघटनेत सक्रिय सहभाग
श्व् शासनाने जाहिर केले होते एकुण 08 लाख रूपयांचे बक्षिस.
गडचिरोली,दि.२०ः- शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. आज रामसु दुर्गु पोयाम ऊर्फ नरसिंग (ए.सी.एम), वय 55, रा. गट्टानेली, ता. धानोरा, जि. गडचिरोली व रमेश शामु कंुजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित (दलम सदस्य), वय 25, रा. वेडमेट्टा, जि. नारायणपूर (छ.ग.) यांनी गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.
महाराष्ट्र शासनाने रामसु दुर्गु पोयाम ऊर्फ नरसिंग याच्यावर 06 लाख व रमेश शामु कंुजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित याच्यावर 02 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.आत्मसमर्पणानंतर शासनाकडून आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रामसु दुर्गु पोयाम ऊर्फ नरसिंग याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.
 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रमेश शामु कंुजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी फक्त यावर्षात 20 जहाल माओवाद्यांसह सन 2022 ते आतापर्यंत एकुण 33 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई  संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर,अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, सुजीत कुमार, प्रभारी समादेशक, 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.