जि.प.परिचर रविंद्र कटरेची हत्या?

0
1845

गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे परिचर रविंद्र चुन्नीलाल कटरे चा फुलचूरनजीकच्या किसानचौक परिसरातील शेतशिवारात आज २८ डिसेबंरला मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. रविंद्र कटरे हा शुक्रवारला सायकांळी घरुन निघालेला होता.रात्रीला घरी परतला नाही.त्यातच आज शनिवारला सुध्दा घरी परतला नव्हता.त्यातच सायकांळी ४ वाजेचा सुमारास किसान चौकातील रस्त्यापासून २०० फूट अंतरावर एका शेतात रविंद्रचा मृतदेह आढळला.