गडचिरोली,दि.०२ः दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तहसीलमधील कियेर गावात आज पहाटे माओवाद्यांनी एका निष्पाप नागरिकाची हत्या केली आहे. मौजा कियेर येथील रहिवासी सुखराम मडावी, वय ४५ वर्षे, यांचा गळा दाबून खून करण्यात आला आहे.
मृतदेहाजवळ सापडलेल्या पत्रकात माओवाद्यांनी खोटा आरोप केला आहे की सुखराम मडावी हे पोलिसांचे खबरी होते. त्यांनी परिसरात पेनगुंडासारखे नवीन पोलीस मदत केंद्र उघडण्यास पोलिसांना मदत केली होती आणि पोलिसांना माहिती पुरवत होते.या वर्षातील माओवाद्यांकडून करण्यात आलेली ही पहिलीच सामान्य नागरिकाची हत्या आहे. गडचिरोली पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.