रस्त्यावरील उभ्या ट्रॅक्टरमुळे घात; एक ठार, सहा जखमी

0
18

अकोला : जिल्ह्यातील आपातापा मार्गावर तीन वाहने एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या अपघातात एकाचा जागीचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक जखमींना शासकीय रुग्णालयात हलवले, पोलिसांनी घटनास्थळ गाठण्यात उशीर केल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. अकोला जिल्ह्यातील आपातापा मार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला. या अपघातात तीन वाहने एकमेकांवर धडकली. या भीषण अपघातामध्ये एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

आपातापा मार्गावर विद्युत मंडळाचे खांब बसवण्याचे काम सुरू होते. अकोला शहरातून आपातापाकडे जाणारी मालवाहू मोटार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर धडकली. त्याचवेळी अकोल्याहून पुढे जाणारी दुसरी प्रवासी मोटार देखील या अपघातावर जाऊन धडकली. या भीषण अपघातामध्ये आपातापा येथील शंकर रामदास बापटे यांचा मृत्यू झाला असून, एका मोटारीच्या चालकासह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांसाठी मदतकार्य सुरू केले.