चायनीज दुकान चालकाची गळफास लावुन आत्महत्या

0
224

अर्जुनी-मोर.-स्थानीक जुना बसस्थानक परिसरात चायनीज दुकान चालकाने अर्जुनी-मोर. – नवेगावबांध मार्गावरील सुकळी जंगल शिवारात झाडाला गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना आज ता.9 मार्चला सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.प्रविण तुकाराम तोंडरे वय 35 वर्षे ह.मु.अर्जुनी-मोर. असे आत्महत्या केलेल्या ईसमाचे नांव आहे.
मृतक प्रविण तोंडरे यांचे मुळगाव भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर आहे.मृतकाची पत्नी अर्जुनी-मोर. पोलीस स्टेशनला पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे. मृतक हा बेरोजगार असल्याने त्यांनी अर्जुनी-मोर. येथे जुना बसस्थानक परिसरात राजपुत चायनिज अँड बिर्याणी सेंटर या नावानी दुकान लावली होती.पती पत्नी व एक पाच वर्षाचा मुलगा असा त्यांचा परिवार अर्जुनी-मोर. येथे रहात होता.सर्व काही सुरळीत असताना मृतक प्रविण तोंडरे हा 7 मार्च पासुन बेपत्ता होता.आज 9 मार्च ला प्रविण चे प्रेत अर्जुनी-मोर. पासुन चार ते पाच कि.मी.अंतरावरील सुकळी जंगल परिसरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळुन आले.अर्जुनी-मोर. पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.व शवविच्छेदनासाठी ग्रा.रु.अर्जुनी-मोर. येथे पाठवीले.मृतकाचे अंत्यसंस्कार लाखांदुर येथे होणार आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांचे मार्गदर्शनात रोशन गोंडाणे व त्यांचे सहकारी करीत आहेत.