होळीची लाकडे आणण्याच्या नादात गेला चिमुकल्याचा जीव

0
395

कन्हान : होळीकरिता लाकडे गोळा कर ण्याच्या नादात लाकुड अंगावर पडुन लाकडासह नाली च्या पारीवर पडुन १३ वर्षिय चिमुकल्या मुलाचा करूण अंत झाला. ही घटना काल सोमवार (दि.१०) मार्च ला घडली. मृतक बालकाचे नाव अरूण दुर्गाप्रसाद कश्यप रा. कांद्री- कन्हान असे आहे.

प्राप्त माहितीनुसार सोमवार (दि.१०) मार्च ला सायंकाळी ४ ते ५ वाजता दरम्यान मित्रांबरोबर होळी करिता लाकडे गोळा करण्यासाठी नेहरू हॉस्पीटलच्या मागच्या परिसरात पडुन असलेले लाकुड उचलुन आणण्यास गेलेल्या मुलापैकी एका मुलाच्या अंगावर लाकुड उभे करित असताना तोल गेल्याने चिमुकला अरूण लाकडासह नालीच्या स्लापवर पडला. त्यात त्याच्या डोक्याला व छातीला जबर मार लागुन रक्त स्त्राव झाल्याने प्रथम त्याला नेहरू हॉस्पीटल व नंतर आशा हॉस्पीटल कामठी येथे नेण्यात आले.परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. आज मंगळवार (दि.११) मार्च शवविच्छेदनानंतर सायंकाळी ४ वाजे च्या सुमारास त्याच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार कर ण्यात आला. कन्हान पोलिसांनी वडिल दुर्गाप्रसाद गयाप्रसाद कश्यप राह. कांद्री जे एन हॉस्पिटल परिसर यांच्या बयाणावरुन अकस्मात मुत्यु ची नोंद घेतली असुन पुढील तपास सुरू आहे.