पुष्पा स्टाईलने सागवानची तस्करी;अंदाजे 16.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, 5 आरोपी फरार

0
2341

कोरची (Gadchiroli) :- आदिवासी बहुल असलेल्या कोरची तालुक्यात 40 ते 50 वर्षांपासून उभे असलेल्या सागवानच्या झाडावर तस्करांनी आपला डोळा ठेवला असून आजपर्यंत या तस्करांनी तालुक्यातील करोडो रुपयांचा मुद्देमाल विकून टाकत सागवान चे जंगल साफ केल्याचे दिसून येत आहे.

मागील काही दिवसांपासून या टोळीच्या शोधात वनविभाग होते, परंतु ते नेहमी वन विभागाला चकमा देत असल्यामुळे वनविभागाला कार्यवाही करण्यामध्ये अडचणीच्या सामना करावा लागत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली. क्मागील काही दिवसांपासून पुष्पा स्टाईलने अशाप्रकारे यांचे अवैध धंदे सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एखाद्या सिनेचित्रपटाला सुद्धा लाजवेल असे काहीसे चित्र या जंगल परिसरात दिसून आले. काल वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना बेतकाठी च्या जंगलात सागवानची तस्करी होत असल्याची कुजबुज लागली होती त्या आधारे वनविभागाच्या चमुने सापळा रचत रात्री सुमारे आठ वाजेपासून या तस्करांवर पाडत ठेवली होती. मध्यरात्री सुमारे 12 च्या दरम्यान ट्रॅक्टर (tractor) मध्ये सागवानचे लठ्ठे भरून निघत असताना वन विभागाने (Forest Department) धडक मोहीम राबवली. वनविभागाचे कर्मचारी आपल्या दिशेने येत असल्याचे बघून झाड तोडणारे मजूर व तस्कर पसर झाले, परंतु त्यापैकी एका तस्कराला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.

अटक करण्यात आलेला आरोपी सुरेश रामलाल होळी हा कोरची तालुक्यातील कुमकोट येथील रहिवासी असून आरोपीवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम (26) 1 ए.बी.एफ.एच नियम 2 उपनियम 1 तसेच कलम 41, 42 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून मोक्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी एल. एम. ठाकरे, वनरक्षक एस. एम. ठाकरे, व्ही. एस. कवडो, सी. एस. मडावी, एन. आर. मितलामी, एम. बी. कुंजाम, जे. एम. चुरगाये व बेतकाठी गावातील 15 ते 20 गावकरी उपस्थित होते. आज सकाळी सहाय्यक वनरक्षक व्ही. व्ही. धांडे यांनी बेडगाव येथे येऊन संपूर्ण प्रकरणाची पाहणी केली.