सडक अर्जुनी दि.०२ः :येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कोसमतोंडी सहवन क्षेत्रातील गोंगले नियत क्षेत्रातील रेंगेपार झुडपी जंगल परिसरात रात्रीला विशेष पथक सामूहिक गस्तीवर असताना रात्री 11.50 वाजेच्या सुमारास रावजी नालापरिसरात दोन ट्रॅक्टर अवैधरित्या रेती भरताना आढळुन आल्याने सदर ट्रॅक्टर वनाधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी पकडून वनरक्षक हिवराज गायधने यांनी सदर आरोपी वर वन गुन्हा दाखल केला.यावेळी सहाय्यक वनसंरक्षक सचिन डोंगरवार यांच्या मार्गदर्शनात सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, कोसमतोंडीचे क्षेत्र सहाय्यक फुलचंद शेंडे , गोंगले चे वनरक्षक हिवराज गायधने , नितेश ठवकर, सारिखा नागपुरे, महेश पाटील, वनमजूर विजय पुस्तोडे, चुळामन पुस्तोडे, श्यामकुवर कवरे कर्मचारी उपस्थित होते.