37.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता ५ हजार रुपयाची लाच घेताना महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता विजय जाधवला अटक

५ हजार रुपयाची लाच घेताना महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता विजय जाधवला अटक

0
37031

blank

सोलार पॅनलचे चेकलिस्टवर सही करण्यासाठी केली होती ५ हजार रुपयांची मागणी

सिंधुदुर्ग:-सोलार पॅनलचे चेकलिस्टवर सही करण्यासाठी ५ हजार रुपये मागणी करणाऱ्या कुडाळ महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता विजय नरसिंग जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही रक्कम घेताना रंगेहात पकडले.

कुडाळ येथील तक्रारदार हे अल्पी पोलराईज्ड टेकसोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे सोलारचे काम करतात यांनी बसवलेल्या सोलार पॅनलचे चेकलिस्टवर सही करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता (वर्ग २) विजय जाधव यांनी ५ हजार रुपये मागितले होते. याबाबत ५ मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली. होती या तक्रारीची प्रतिबंध विभागाने पडताळणी केली असता सापळा रचण्यात आला आज (मंगळवारी) या सापळ्यामध्ये महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विजय जाधव हे अडकले त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) चे कलम ७ प्रमाणे कुडाळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज जिरगे यांच्यासह पोलीस हवालदार पालकर, पोलीस हवालदार रेवणकर,अजित खंडे यांनी केली.

blank