एन.एम.एम.एस.परीक्षेत जि. प.शाळा, मोरगाव चे 3 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

0
37

अर्जुनी/ मोर-नजीकच्या जि. प.वरिष्ठ प्राथ.शाळा, मोरगाव येथील सन 2020-21 या शैक्षणिक सत्रात घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस.परीक्षेत 3 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन, गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्यामुळे, सदर शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलेले आहेत.
जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगांव येथे सन२०२०-२१या शैक्षणिक सत्रात सर्व ८ विचे ८ विद्यार्थी, एन. एम. एम.एस. परीक्षेत सामील झालेले होते त्यापैकी 3 विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याने, त्यांना प्रती विद्यार्थी वार्षिक शिष्यवृत्ती रू.12000/_सतत चार वर्ष मिळणार आहे.
मुक्ताई लोदीचे सुयश
शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांपैकी कु. मुक्ताई लोदी ह्या विद्यार्थिनीने गोंदिया जिल्हातून गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक प्राप्त करून घव घवित सुयश प्राप्त केलेले आहे.एन.एम.एम.एस.परीक्षेत जि. प.वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगावचे सुयश प्राप्त विद्यार्थी मुक्ताई लोदी, सायली अंबादे, कुणाल मेश्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
मोरगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस. परीक्षेत गतवर्षी याच शाळेतील ५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले होते. यशाची ही परंपरा विद्यर्थ्यांनी कायम राखली, त्यामुळे पालक, शिक्षक व अधिकाऱ्यांनी सदर विद्यार्थ्यांचें अभिनंदन केले.ग्रामीन भागातील जि. प.शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून वेळोवळी होणारे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त सराव तासिका यामुळे जि. प. शाळा, सुद्धा अलीकडे कात टाकत असल्याचे चित्र दिसत आहे या स्पर्धातात्मक युगात शहरी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा उतरत असल्याने परिसरातून शालेय विद्यार्थी व प्रशासनाची प्रशंसा केली जात आहे.सदर परीक्षेत शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा गोंडाने यांचे मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षक पी.पी.गहाने,पदवीधर शिक्षक सु.मो.भैसारे,विषयशिक्षक प्राची कागणे-ठाकूर, मोहन नाईक,जितेंद्र ठवकर, वामन घरतकर ,अचला कापगते-झोडे आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन व सराव यामुळे हे यश संपादन करणे शक्य झाल्याची चर्चा जण-मानसातून व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे. यश संपादित विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी आर.एल.मांढरे,वरिष्ठ विस्तार अधिकारी अशोक बरईकर ,केंद्रप्रमुख मनोहर हुकरे,मुख्याध्यापिका रेखा गोंडाणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुनेश्वर शहारे, तानाजी लोदी व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले.