पितृछत्र हरविलेल्या कूटुंबाला शिक्षकांची मदत

0
54

गोंदिया,दि.23ः- तालुक्यातील निलज येथील पितृक्षत्र हरवलेल्या कूटुंबाला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी एकत्रित येत आर्थिक व साहित्याची मदत करुन सहकार्य केले.सविस्तर असे की १२ आँगस्टला निलज येथील स्व.श्री.जितेन्द्र डहाट यांचे तलावात बूडून मृत्यू झाला.त्यांचे पश्चात पत्नी व दोन मूले एक पहिली व दूसरा पाचव्या इयत्तेत शिकत आहे.अशा या कूटुंबातील कमावता सदस्य निघून जाण्याने कूटुंब निराधार झाले.त्यामुळे हलाखिची परिस्थिती असलेल्या व निराधार झालेल्या कूटूंबाला मदत करण्याचा निर्धार जि.प.पू.मा.शाळा निलज येथील शिक्षकांनी घेतला.यासाठी दासगाव केंद्राचे केंद्र प्रमुख मनोज दिक्षित,रुपलालजी येडे शा.व्य.स.अध्यक्ष यांचे मार्गदर्शनात मुख्याध्यापक बी.बी.मेंढे, एस.पी.डोंगरे,एम.डी.पटले, श्रीमती यु. एफ.रिनायत, श्रीमती आय. के.ठाकरे,व्ही.एफ.कोसमे यांनी आज २३ आँगस्टला डहाट कूटुंबाला भेट देऊन जिवनावश्यक अन्नधान्य साहित्य संच, कपडे व रोख रक्कम मदत देऊन परीवाराचे सांत्वन केले.