महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 4 सप्टेंबरला

0
37

गोंदिया,दि.26 :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2020 येत्या       4 सप्टेंबर 2021 रोजी जिल्ह्यातील एकूण अकरा उपकेंद्रावर एका सत्रात सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत गोंदिया येथील एस.एस.गर्ल्स कॉलेज विठ्ठलनगर, एस.एस.अग्रवाल मुन्सीपल गर्ल्स हायस्कुल विठ्ठलनगर, मनोहर मुन्सीपल हायर सेकंडरी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इंदिरा गांधी स्टेडियम जवळ, धोटे बंधू सायन्स कॉलेज कुडवा रोड रामनगर, सेंट झेवियर्स हायस्कुल विजयनगर बालाघाट रोड, बी.एन.आदर्श सिंधी विद्यामंदिर हायस्कूल मुर्री रोड, गुजराती नॅशनल हायस्कूल रेलटोली, साकेत पब्लिक स्कुल बजाजनगर फुलचूर रोड, विवेक मंदीर स्कुल हरिओम कॉलनी छोटा गोंदिया, रविन्द्रनाथ टागोर हायस्कुल रेलटोली, राजस्थान कन्या विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् कुष्णपुरा वार्ड मोटवाणी चेंबर जवळ, गोंदिया या परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षा केंद्राचे परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त  व्यक्ती एकत्रीतरित्या प्रवेश करणार नाहीत व कोणत्याही प्रकारची घोषणा देण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राचे परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही.परीक्षा केंद्राचे 200 मीटर परिसरातील झेरॉक्स/फॅक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग सेंटर, एसटीडी बुथ, पेजर व ध्वनीक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल, लॅपटॉप कम्प्यूटर व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यामध्ये कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस/वाहनास प्रवेशास मनाई राहील. या परीक्षा प्रक्रिये दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ची कलम 144 चे मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. सदर आदेश 4 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी जयराम देशपांडे यांनी कळविले आहे.