Home शैक्षणिक जाती दावा पडताळणी संदर्भात आवश्यक सूचना

जाती दावा पडताळणी संदर्भात आवश्यक सूचना

0

गोंदिया,दि.23 : सन 2022-23 या सत्रात व्यावसायिक शिक्षण प्रवेश प्रक्रियेमध्ये (सीईटी, निट, एनटीए सारख्या) सहभाग घेऊन अभियांत्रिकी, वैद्यकीय फॉर्मसी, अध्यापन पदवी यासारख्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी यांचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदिया येथे अर्ज स्विकारण्यात येत असून जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेळेच्या आत ऑफलाईन पध्दतीने आपले अर्ज कार्यालयात जमा करावे.

         तसेच ‘सामाजिक समता सप्ताह’ कार्यक्रमाची सांगता म्हणून 30 एप्रिल 2022 पर्यंत त्रुटी पुर्ततेसंदर्भात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. माहे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये ज्या अर्जदारांनी सेवा/शैक्षणिक व निवडणूक संबंधी अर्ज सादर केले होते व अद्यापही त्यांचे जाती दावा पडताळणी प्रकरणात त्रुटी पुर्तता केलेली नाही अशा अर्जदारांनी त्यांचे जातीच्या प्रवर्गानुसार (अनु.जाती करीता 10 ऑगस्ट 1950, विजाभज करीता 21 नोव्हेंबर 1961 व इमाव तसेच विमाप्र करीता 13 ऑक्टोबर 1967 ही मानीव दिनांक) मानीव दिनांकापुर्वीचे/लगतचे जात नोंदीचे व अधिवासाचे पुरावे व सहसंबंध जुळणारे पुरावे सादर करणे आवश्यक आहे. सदर अर्जदारांना त्रुटी पत्रे पाठविण्यात आलेले असून ई-मेल द्वारे सुध्दा कळविण्यात आलेले आहे. आवश्यक त्या पुराव्यासह समिती कार्यालयात शासकीय सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन दिवशी व वेळेत मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे. असे आवाहन उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य यांनी केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version