Home शैक्षणिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात करियर कट्टा अंतर्गत जिव्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात करियर कट्टा अंतर्गत जिव्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

0

गोंदिया,दि.25ः महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभाग , महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्टा उपक्रमाअंतर्गत २२ एप्रिल २०२२ रोजी “करियर कट्ट्याचे बदललेले स्वरूप आणि नॅक मूल्यांकनात होणार फायदा ” या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उदघाटक डा.अंजन नायडू ,प्राचार्य, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय ,गोंदिया , मुख्य मार्गदर्शक यशवंत शितोळे , अध्यक्ष महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, कार्यक्रमाचे अध्यक्ष  डा. ईश्वर मोहुर्ले , प्राचार्य , एस. एस. जायस्वाल महाविद्यालय , मोरगाव अर्जुनी, मुख्य अतिथी  डा. एल. एच. जीवाणी , प्राचार्य , एम बी . पटेल महाविद्यालय , सालेकसा , प्रा. संजय तिमांडे , उप प्राचार्य धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय , गोंदिया, डा . राकेश धुवारे, कंप्युटर विज्ञान विभागप्रमुख , डाँ . दिलीप चौधरी- आई क्यू ए सी समन्वयक आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रा. धर्मवीर चौहान यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचा उदघाटन सोहळा शिक्षण महर्षी पुज्यनिक मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीपप्रज्वलन करून संपन्न झाला.
करिअर कट्टा माहिती पुस्तिकेचे करण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजक व करियर कट्टा जिल्हा संयोजक प्रा. धर्मवीर चौहान यांनी करिअर कट्टा या महाराष्ट शासनाचे विद्यार्थ्यांना होणारे फायदे विशद केले तसेच कार्यशाळे उद्देश उपस्थींतानां सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात मुख्य मार्गदर्शक यशवंत शितोळे यांनी युवा विध्यार्थ्यांच्या भविष्यासाठी करिअर कट्ट्याचे असलेले महत्व या विषयावर पद्युत्तर व पदवी अभ्यासक्रमाच्या विध्यार्थ्यांना मार्गर्शन केले. दुसऱ्या सत्रात गोंदिया जिल्यातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य , आई, क्यू. ए, सी. समन्वयक , करियर कट्टा समन्वयक यांना “करियर कट्ट्याचे बदललेले स्वरूप आणि नॅक मूल्यांकनात होणार फायदा ” या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष  डा . ईश्वर मोहुर्ले म्हणाले करियर कट्ट्याचे विविध उपक्रम नॅक मूल्यांकनाच्या दृष्टीने महाविद्यालयासाठी फार उपयुक्त आहेत. त्यांनी सर्व प्राचार्य व समन्वयक यांनी करियर कट्टा सर्व विध्यार्थ्यांन पर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.
या कार्यशाळेत विभिन्न महाविद्यालयाचे प्राचार्य , आई, क्यू. ए, सी. समन्वयक , करियर कट्टा समन्वयक, प्राध्यापक यांनी तर विध्यार्थी मार्गदर्शन सत्रात २०० विद्यार्त्यानी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे संयोजक व करियर कट्टा जिल्हा संयोजक प्रा. धर्मवीर चौहान यांनी अतिथी वक्तांची ओळख करुन दिली तर डाँ . दिलीप चौधरी- आई क्यू ए सी समन्वयक यांनी आभार मानले.डॉ.अंजन नायडू (प्राचार्य) यांच्या मार्गदर्शनात प्रा.एस.पी. तिमांडे, डॉ.डी.एस. चौधरी, कार्यक्रम संयोजक प्रा.धर्मवीर चौहान, आणि सर्व कर्मचारी सदस्यांनी यशस्वीरीत्या या शिबिराचे आयोजन केले.
शिबिराचे उद्घाटक डा.अंजन नायडू ,प्राचार्य , धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय , गोंदिया आपल्या प्रतिपादनात म्हणाले, विद्यार्थ्यांकडे समर्पण व वचनबद्धता असल्यास आयएएस / आयपीएस यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कारकीर्दीत मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत, आणि ते पुढे म्हणाले की यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण असणे आवश्यक आहे. करिअर कट्टा हे एक विद्यार्थी हिताचे पटल आहे , याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

Exit mobile version