Home शैक्षणिक एक्युट पब्लिक शाळेची विद्यार्थिनी कु. रीयांशा कैलाश शहारे राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

एक्युट पब्लिक शाळेची विद्यार्थिनी कु. रीयांशा कैलाश शहारे राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

0

गोंदिया,दि.29ः- देशाच्या प्रगतीसाठी पुरस्काराची अपेक्षा न बाळगता समाजसेवा करणे अशी स्काउट गाईड ही एक ११४ वर्ष जुनी अशीही चळवळ असून ५६ लाखांपैकी १४ लाख स्काउट गाईड केवळ एकट्या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील ७५० स्काउट गाईड राज्य पुरस्कार विजेत्यां पैकी १४५ स्काउट गाईड यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते २६ एप्रिल २०२२ रोजी स्काउट गाईड पॅव्हीलियन शिवाजी पार्क,दादर, मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी क्रीडामंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे तसेच राज्य मुख्य आयुक्त ओमप्रकाश बकोरीया उपस्थित होते.  स्काउटगाईड अभ्यासक्रमात हा पुरस्कार उच्च मानला जातो. प्रथम, द्वितीयव तृतिय सोपान परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर राज्य पुरस्कार परीक्षेत प्रवेश दिला जातो. एक्युट पब्लिक शाळेतील कु. रीयांशा कैलाश शहारे ही विद्यार्थिनी उत्तीर्ण झाली.या विद्यार्थिनीने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय संज्योत बहुउद्देशीय शिक्षणसंस्थेच्या प्रेरणास्त्रोत गीताताई भास्कर, सचिव संजयकुमार भास्कर,सहसचिव शुभा शहारे तसेच शाळेचे मुख्याध्यापक अमितकुमार ,मुख्याध्यापिका श्रीमती उज्वला,पर्यवेक्षक प्रवीणकुमार ,गाईड ललिता कुथे व शिक्षक वृध्दांना दिले.

Exit mobile version