सितेपार माध्यमिक विद्यालयात सायकलींचे वाटप

0
27

 आमगाव- तालुक्यातील सितेपार येथील छत्रपती माध्यमिक विद्यालय येथे मानव विकास योजनेतंर्गत शालेय विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. यानिमित्त २८ मे रोजी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शासनाच्या मानव विकास विभागातर्फे शाळेत दूर अंतरावर येणार्‍या विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप केले. ज्ञानार्जनासाठी कोणतीही अडचण येवू नये, यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. यानुरूप छत्रपती माध्यमिक महाविद्यालय सितेपार येथे शालेय विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते.